Euro Cup 2020: इंग्लंड आणि क्रोएशिया यांच्यात लढत

यूरो कप २०२० स्पर्धेला रंग चढत असताना आज इंग्लंड विरुद्ध क्रोएशिया सामना रंगणार आहे. लंडनमधील वेम्बली मैदानात हा सामना खेळला जाणार आहे.

England Football Team
यूरो कप २०२० स्पर्धेत इंग्लंड विरुद्ध क्रोएशिया सामना (Source: Reuters)

यूरो कप २०२० स्पर्धेला रंग चढत असताना आज इंग्लंड विरुद्ध क्रोएशिया सामना रंगणार आहे. लंडनमधील वेम्बली मैदानात हा सामना खेळला जाणार आहे. गट ‘ड’मधील हा पहिला सामना असून स्पर्धेतील पाचवा सामना आहे. इंग्लंडचा संघ सलग ६ सामने जिंकत या स्पर्धेत पोहोचला आहे. गेल्याच आठवड्यात इंग्लंडने रोमानियावर विजय मिळवला होता. असं असलं तरी क्रोएशियाचं तगडं आव्हान इंग्लंडसमोर असणार आहे. २०१८ च्या फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत क्रोएशियाने इंग्लंडला पराभूत केलं होतं. त्यानंतर नेशंस कपमध्ये इंग्लंडने क्रोएशियाला पराभूत करत वचपा काढला होता. आता पुन्हा हे दोन संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

सामन्यातील महत्त्वपूर्ण बाबी

  • मोठ्या स्पर्धेत इंग्लंड आणि क्रोएशियातील ही तिसरी लढत आहे. २००४ च्या यूरो कपमध्ये इंग्लंडने क्रोएशियाला ४-२ ने पराभूत केलं होते. तर २०१८ च्या फिफा विश्वचषकात क्रोएशियाने इंग्लंला पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती.
  • इंग्लंडचा संघ दहाव्यांदा यूरो चषक खेळत आहे. इंग्लंडला एकदाही हा चषक जिंकता आला नाही. मात्र सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम इंग्लंडच्या नावावर आहे. इंग्लंडचा संघ आतापर्यंत ३१ सामने खेळला आहे.
  • आजचा सामना लंडनमधील वेम्बली मैदानात खेळला जाणार आहे. या मैदानात इंग्लंडचं वर्चस्व दिसून आलं आहे. मोठ्या स्पर्धेतील एकही सामना इंग्लंडने या मैदानात गमावला नाही
  • यूरो चषकात इंग्लंडने एकही ओपनिंग मॅच जिंकली नाही. तर क्रोएशिया पाच ओपनिंग सामन्यात विजय प्रस्थापित करण्यात यशस्वी ठरली आहे.

आतापर्यंत या दोन्ही संघाचा इतिहास पाहिला तर दोन्ही संघ १० वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी ५ सामने इंग्लंडने तर ३ सामने क्रोएशियाने जिंकले आहेत. दोन सामने अनिर्णित राहीले आहेत. नोव्हेंबर २०१८ मध्ये शेवटचा सामना या दोघांनी खेळला होता. तो सामना इंग्लंडने २-१ ने जिंकला होता.

युरो कपमधील ‘त्या’ धक्कादायक घटनेनंतर मुंबई इंडियन्सचं ट्वीट होतंय व्हायरल!

Euro Cup 2020: इंग्लंड आणि क्रोएशिया सामना

वेळ : भारतीय वेळेनुसार सायं. ६.३० वा.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Euro cup 2020 football match fight between gngland and croatia rmt