यूरो कप २०२० स्पर्धेत आता उपांत्यपूर्व फेरीचे सामने रंगणार आहेत. तत्पूर्वी स्कॉटलँडमधून करोना संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्कॉटलँडमधून यूरो कप स्पर्धा पाहण्यसाठी गेलेल्या जवळपास दोन हजार लोकांना करोनाची लागण झाली आहे. यामुळे स्कॉटलँड प्रशासन सतर्क झालं आहे. यूरो कप स्पर्धेतील ‘ड’ गटात झालेल्या साखळी फेरीत स्कॉटलँड संघ एकूण तीन सामने खेळला. मात्र निराशाजनक कामगिरीमुळे संघाचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं. त्यानंतर निराश होऊन चाहते मायदेशी परतले.

साखळी फेरीतील इंग्लंडविरुद्धच्या दुसरा सामन्यासाठी स्कॉटलँडमधील संघाचे चाहते लंडनमध्ये गेले होते. हा सामना लंडनमधील वेम्बले स्टेडियमवर होता. यावेळी प्रेक्षकांना सामना पाहण्याची अनुमती देण्यात आली होती. यावेळी मैदानात प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली होती. साखळी फेरीतील तिसऱ्या सामन्यासाठी स्कॉटलँडचे चाहते ग्लासगोच्या हॅम्पेडेन मैदानात पोहोचले होते. त्यानंतर स्कॉटलँडचं अस्तित्व साखळी फेरीतच संपुष्टात आल्याने चाहते मायदेशी परतले. यावेळी परतलेल्या चाहत्यांची करोना चाचणी करण्यात आली. तेव्हा १९९१ जणांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. हे सर्व जण यूरो कप २०२० स्पर्धा पाहण्यासाठी गेले होते. यापैकी १ हजार २९४ जण इंग्लंड विरुद्धच्या सामन्यासाठी वेम्बले मैदानात उपस्थित होते. तर क्रोएशिया विरुद्धच्या सामन्यात उपस्थित असलेल्या ३८ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर चेक रिपब्लिक विरुद्धच्या सामन्यात उपस्थित एसलेल्या ३७ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

जानेवारी २०२२ पर्यंत क्रिकेट सामन्यांची पर्वणी, टीम इंडियाचं व्यस्त वेळापत्रक

१४ जुलैला स्कॉटलँडचा पहिला सामना चेक रिपब्लिक संघासोबत झाला. यात स्कॉटलँडला चेक रिपब्लिकने २-० ने पराभूत केलं. त्यानंतर इंग्लंड विरुद्धचा सामना गोलरहित म्हणजेत ०-० ने बरोबरीत सुटला. तर तिसऱ्या सामन्यात क्रोएशियाने स्कॉटलँडचा ३-१ पराभव केला. या पराभवानंतर स्कॉटलँडचं यूरो कप २०२० स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं.

स्टार फुटबॉलपटू मेसी आता स्वतंत्र; २० वर्षांपासून बार्सिलोनासोबत असलेलं नातं संपलं

ब्रिटनमध्ये बुधवारी २६ हजार ६८ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. २९ जानेवारीनंतर सर्वाधिक रुग्ण सापडले असल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे.