Euro cup 2021 : इटलीची विजयी सलामी!

टर्कीवर मिळवला ३-० ने एकतर्फी विजय…

Euro cup 2021 Italy winning opener One sided victory over Turkey 3 0
इटलीचा सीरो इमोबाईल गोल करताना (फोटो सौजन्य Twitter/UEFA)

वर्ल्ड चॅम्पियनचा किताब चारवेळा मिळवणाऱ्या इटलीने सलामीच्या सामन्यातच टर्कीला पराभूत करत एकतर्फी विजय मिळवला. इटलीने ३ गोल नोंदवत दमदार सुरुवात केली आहे.  इटलीच्या स्ट्रायकर सिरो इमोबिल आणि इन्सिग्ने यांनी प्रत्येकी एक-एक गोल गेला. तर टर्कीच्या देमिरालने स्वंयगोल करत संघाच्या अडचणीत भर घातली. इटली आणि टर्की यांच्यात आतापर्यंत झालेल्या ११ सामन्यात इटलीने ८ वा विजय नोंदवला आहे. या दोन्ही संघातील ३ सामने अनिर्णित देखील राहिले आहेत. इटली विरुद्ध पहिल्या विजयाचा टर्कीची प्रतिक्षा कायम राहिली आहे. या विजयासह इटलीने रोममध्ये मोठ्या स्पर्धेत पराभूत न होण्याचा विक्रम कायम ठेवली आहे.

डेन्मार्कची गाठ फिनलँडशी

शनिवारी ब-गटात डेन्मार्कची लढत फिनलँडशी होणार आहे. डेन्मार्क संघात दमदार खेळाडूंचा भरणा असल्यामुळे या सामन्यात त्यांची बाजू वरचढ ठरू शकते. डेन्मार्कने फिनलँडविरुद्धच्या गेल्या ५९ सामन्यांपैकी ३८ सामने जिंकले आहेत. ख्रिस्तियन एरिक्सेन, मार्टिन ब्रेथवेट आणि यूस्सूफ पौलसेन यांच्यावर डेन्मार्कची भिस्त असेल. फिनलँडच्या टीमू पुक्की याला गेल्या आठवडय़ात दुखापत झाल्याने संघाच्या चिंता वाढल्या आहेत.

वेल्सचा सामना स्वित्झर्लंडशी

२०१६मध्ये युरो चषकाची उपांत्य फेरी गाठणाऱ्या वेल्स संघाला शनिवारी स्वित्झर्लंडशी लढत द्यावी लागेल. अ गटात अव्वल संघांचा भरणा असल्यामुळे बाद फेरी गाठण्याचे आव्हान या दोन्ही संघांसमोर असेल. गॅरेथ बेल आरोन रामसे आणि जो अलेन यांच्या कामगिरीवर वेल्स संघ अवलंबून आहे. स्वित्झर्लंडला व्लादिमिर पेटकोव्हिच, मारियो गोरानोव्हिच यांच्याकडून चांगली कामगिरी अपेक्षित आहे.

९  वेळ : सायं. ६.३० वा.

वेल्स वि. स्वित्झर्लंड

९  वेळ : रात्री ९.३० वा.

डेन्मार्क वि. फिनलँड

९  वेळ : मध्यरात्री १२.३० वा.

बेल्जियम वि. रशिया

*  थेट प्रक्षेपण : सोनी टेन २, सोनी टेन ३ (हिंदी) आणि एचडी वाहिन्या

सर्वोत्तम कामगिरी

* ३ सर्वाधिक जेतेपदे : जर्मनी, स्पेन

* ३ सर्वाधिक उपविजेतेपद : जर्मनी, रशिया

* ६ सर्वाधिक अंतिम फेरी : जर्मनी

* ९ सर्वाधिक उपांत्य फेरी : जर्मनी

* १० सर्वाधिक सहभाग : जर्मनी

* ४९ सर्वाधिक सामने : जर्मनी

* २६ सर्वाधिक विजय : जर्मनी

* ८६ सर्वाधिक गोल : फ्रान्स

* १४ सर्वाधिक गोल : फ्रान्स

हे सामने चुकवू नका!

* १३ जून      मध्यरात्री १२.३० वा.     बेल्जियम वि. रशिया

* १३ जून      सायं. ६.३०  वा. इंग्लंड वि. क्रोएशिया

* १६ जून      मध्यरात्री १२.३० वा.     फ्रान्स वि. जर्मनी

* १७ जून      रात्री ९.३० वा.   डेन्मार्क वि. बेल्जियम

* १८ जून      रात्री ९.३० वा.   क्रोएशिया वि. चेक प्रजासत्ताक

आव्हानात्मक गट

फ-गटाला यंदाच्या युरोमधील सर्वात आव्हानात्मक गट मानले जाते. या गटात फ्रान्स (जागतिक क्रमवारीत : २), पोर्तुगाल (५),  जर्मनी (१२) आणि हंगेरी (३७) यांचा समावेश आहे.

वैयक्तिक कामगिरी

३ सर्वाधिक सलग स्पर्धामधील सहभाग : रेनर बॉनहॉफ (जर्मनी)

५  सर्वाधिक स्पर्धामधील सहभाग : इकर कॅसियास (स्पेन)

२१ सर्वाधिक सामने : ख्रिस्तियानो रोनाल्डा (ब्राझिल)

९ सर्वाधिक गोल: मायकेल प्लाटिनी (फ्रान्स)

लक्षवेधी फुटबॉलपटू

किलियन एम्बापे (फ्रान्स)

हॅरी केन (इंग्लंड)

ख्रिस्तियानो रोनाल्डो (पोर्तुगाल)

रोबटरे लेवांडोव्हस्की (पोलंड)

टोनी क्रूस (जर्मनी)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Euro cup 2021 italy winning opener one sided victory over turkey 3 0 abn

ताज्या बातम्या