Euro 2020 Final England vs Italy : युरोपात इटलीची सत्ता, पेनल्टी शूटआउटमध्ये इंग्लंडवर केली मात

लंडनच्या वेम्बली स्टेडियमवर चाहत्यांनी अनुभवला रंगतदार सामना

Euro cup final 2020 england vs italy match live updates
इटली यूरो कप २०२०चा विजेता

लंडनच्या वेम्बली स्टेडियमवर रंगलेल्या अटीतटीच्या महामुकाबल्यात इटलीने इंग्लंडवर सरशी साधत यूरो कप २०२०च्या विजेतेपदाचा मान पटकावला. होम का रोम, या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात असलेल्या चाहत्यांना वेम्बलीवर पेनल्टी शूटआउटचा थरार पाहायला मिळाला. स्पर्धेतील सर्वात जलद गोल करत दणदणीत सुरुवात करणाऱ्या इंग्लंडचा या सामन्यातील शेवट मात्र कडू ठरला. पहिल्या सत्रात इंग्लंडने एक तर दुसऱ्या सत्रात इटलीने गोल करत बरोबरी साधली होती. ३० मिनिटांच्या अतिरिक्त वेळेतही सामन्याचा निकाल समोर आला नव्हता. पेनल्टी शू़टआउटमध्ये जेडन सँचो, साका आणि रॅशफोर्ड हे खेळाडू इंग्लंडसाठी गोल करण्यात अपयशी ठरले. तब्बल ५५ वर्षांचा दुष्काळ संपवण्याचे इंग्लंडचे स्वप्न हे धूळीस मिळाले आहे.

दुसरे सत्र

दुसऱ्या सत्रात इटलीने जोरदार कमबॅक केले. लिओनार्डोने झळकावलेल्या गोलमुळे इटलीवरील दडपण दूर झाले. मात्र विजयी गोल करण्यात दोन्ही संघांना अपयश आले. दुसऱ्या सत्रातही फुटबॉलवर सर्वाधिक ताबा इटलीच्या खेळाडूंचा दिसून आला. दुसरीकडे मैदानात गैरवर्तन केल्याप्रकरणी इटलीच्या तीन खेळाडूंना पिवळे कार्ड दाखवण्यात आले.

पहिले सत्र

पहिल्या सत्रात इंग्लंड वरचढ ठरले. सामना सुरु झाल्यानंतर अवघ्या १ मिनिटे आणि ५६ व्या सेकंदाला इंग्लंडच्या ल्यूक शॉने गोल झळकावला. यामुळे इटलीच्या संघावर दडपण आले. पहिल्या सत्रात बरोबरी साधण्यासाठी इटलीची चांगलीच दमछाक झाली. इटलीने गोलच्या दिशेने ५ शॉट्स मारले. इंग्लंडने एकदा गोलच्या दिशेने बॉल मारला. पहिल्या सत्रात बॉलवर सर्वाधिक ताबा हा इटलीच्या खेळाडूंचा होता. त्यांनी खेळाडूंकडे ३१४ वेळा बॉल पास केले. त्यांची पास अचूकता ही ८८ टक्के इतकी होती. तर इंग्लंडच्या खेळाडूंनी एकमेकांकडे १७५ वेळा बॉल पास केला. त्यांची पास अचूकता ही ७३ टक्के होती. इटलीला दोन ऑफसाईड्स, तर इंग्लंडला १ ऑफसाईड्स मिळाला. इटली १ कॉर्नर, तर इंग्लंडला २ कॉर्नरच्या संधी मिळाल्या.

Live Blog

03:36 (IST)12 Jul 2021
युरोपात इटलीची सत्ता

इटलीने दुसऱ्यांदा यूरो चषकावर नाव कोरले. यापूर्वी इटलीने १९६८ मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. २००० आणि २०१२ मध्ये त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

03:26 (IST)12 Jul 2021
पेनल्टी शूटआउटमध्ये इटली विजयी

पेनल्टी शूटआउटमध्ये इटलीच्या डॉमेनिको बेरार्डीने पहिला गोल मारला. त्यानंतर इंग्लंडच्या हॅरी केनने गोल झळकावत बरोबरी साधली. त्यानंतर आलेला अँड्रेया बेलोटीने मारलेला फटका इंग्लंडच्या गोलकीपरने अडवला. इंग्लंडने दुसऱ्या संधीचेही सोने केले. हॅरी मिगुरने गोल केला. इटलीच्या बोनुच्चीने तिसऱ्या संधीत गोल केला. इंग्लंडने तिसरी संधी चुकवली. रॅशफोर्डला गोल करता आला नाही. इटलीच्या फेडरिको बर्नाडेश्कीने गोल केला. इंग्लंडने चौथी संधीही चुकवली. जेडन सँचोला गोल करता आला नाही. त्यानंतर इटलीचा जॉर्गिन्होला गोल करता आला नाही. इंग्लंडच्या १९ वर्षीय साकाला गोल करता आला नसल्याने इटलीने पेनल्टी शूटआउटमध्ये ३-२ असा विजय मिळवत यूरो कप २०२०चे विजेतेपद पटकावले.

03:13 (IST)12 Jul 2021
पेनल्टी शूटआउटचा रंगणार थरार!

३० मिनिटांच्या अतिरिक्त वेळेतही दोन्ही संघांना गोल नोंदवता आला नाही. त्यामुळे सामना पेनल्टी शूटआउटमध्ये गेला आहे.

02:53 (IST)12 Jul 2021
१०५ मिनिटांपर्यंत सामना बरोबरीत

अतिरिक्त वेळेच्या अर्ध्यात म्हणजे १०५ मिनिटांपर्यंत दोन्ही संघांनी १-१ अशी बरोबरी राखली आहे. पुढच्या १५ मिनिटात कोणताही गोल झाला नाही. तर साममा  पेनल्टी शूटआउटमध्ये जाईल. 

02:29 (IST)12 Jul 2021
९० मिनिटांच्या खेळात दोन्ही संघांची बरोबरी

९० मिनिटांच्या खेळात दोन्ही संघांना विजयी गोल झळकावता आला नाही. यासाठी अतिरिक्त वेळ देण्यात आली आहे. अतिरिक्त वेळेत विजयी झळकावण्यात अपयशी ठरले. तर सामना पेनल्टी शूटआउटमध्ये जाईल. त्यामुळे विजयी गोल झळकावण्यासाठी दोन्ही संघाची धडपड असणार आहे.

02:28 (IST)12 Jul 2021
इटलीच्या कर्णधाराला पिवळे कार्ड

अतिरिक्त वेळेत इटलीचा कर्णधार चिलीनीला पिवळे कार्ड मिळाले. हे इटलीचे तिसरे पिवळे कार्ड ठरले.

02:22 (IST)12 Jul 2021
अतिरिक्त वेळेत ६ मिनिटांचा वेळ

९० मिनिटांचा खेळ संपल्यानंतर अतिरिक्त ६ मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे. दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीत आहेत.

02:16 (IST)12 Jul 2021
इटलीला दुसरे पिवळे कार्ड

८३व्या मिनिटाला इटली दुसरे पिवळे कार्ड मिळाले. लॉरेंझो इंसिन्यूला पिवळे कार्ड दाखवण्यात आले.

02:08 (IST)12 Jul 2021
इंग्लंडच्या खेळाडूंची रिप्लेसमेंट

७४व्या मिनिटाला इंग्लंडने डेक्लन राइसला बाहेर पाठवून जॉर्डन हेंडरसनला मैदानात आणले.

02:00 (IST)12 Jul 2021
इटलीची इंग्लंडशी बरोबरी

६७व्या मिनिटाला इटलीचा खेळाडू लिओनार्डो बोनच्चीने गोल करत इंग्लंडशी बरोबरी केली. 

01:48 (IST)12 Jul 2021
फ्री किकवर गोल करण्यात दोन्ही संघ अपयशी

५०व्या मिनिटाला इटलीला तर ५५व्या मिनिटाला इंग्लंडला फ्री किक मिळाली. पण दोन्ही संघ गोल करण्यात अपयशी ठरले.

01:40 (IST)12 Jul 2021
दुसऱ्या सत्राला सुरुवात, इटलीला पिवळे कार्ड

इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनला पाडल्यामुळे इटलीच्या निकोला बरेलाला ४७व्या मिनिटाला सामन्यातील पहिले पिवळे कार्ड मिळाले.

01:21 (IST)12 Jul 2021
पहिले सत्र

पहिल्या सत्रात इंग्लंड वरचढ ठरलं. सामना सुरु झाल्यानंतर अवघ्या १ मिनिटं आणि ५६ व्या सेकंदाला इंग्लंडच्या ल्यूक शॉनं गोल झळकावला. यामुळे इटलीच्या संघावर दडपण आलं. पहिल्या सत्रात बरोबरी साधण्यासाठी इटलीची चांगलीच दमछाक झाली. इटलीने गोलच्या दिशेने ५ शॉट्स मारले. इंग्लंडने एकदा गोलच्या दिशेने बॉल मारला. पहिल्या सत्रात बॉलवर सर्वाधिक ताबा हा इटलीच्या खेळाडूंचा होता. त्यांनी खेळाडूंकडे ३१४ वेळा बॉल पास केले. त्यांची पास अचूकता ही ८८ टक्के इतकी होती. तर इंग्लंडच्या खेळाडूंनी एकमेकांकडे १७५ वेळा बॉल पास केला. त्यांची पास अचूकता ही ७३ टक्के होती. इटलीला दोन ऑफसाईड्स, तर इंग्लंडला १ ऑफसाईड्स मिळाला. इटली १ कॉर्नर, तर इंग्लंडला २ कॉर्नरच्या संधी मिळाल्या. आता दुसऱ्या सत्रात कोण वरचढ ठरत? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

01:17 (IST)12 Jul 2021
पहिल्या सत्रात ४ मिनिटांची अतिरिक्त वेळ

पहिल्या सत्रात ४ मिनिटांची अतिरिक्त वेळ देण्यात आली आहे. 

01:07 (IST)12 Jul 2021
चिसाचा प्रयत्न फसला

३४व्या मिनिटाला इटलीचा आक्रमणपटू चिसाने इंग्लंडच्या दोन बचावपटूंना भेदून गोल करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा चेंडू गोलपोस्टच्या बाजूने गेला.

01:01 (IST)12 Jul 2021
Euro Cup 2020: इंग्लंडच्या ल्यूक शॉचा जबरदस्त गोल!; जलद गोल करणाऱ्या खेळाडूंच्या पंगतीत स्थान
00:56 (IST)12 Jul 2021
इटलीच्या जॉर्गीन्होला दुखापत

२२व्या मिनिटाला इटलीच्या जॉर्गीन्होला दुखापतीमुळे बाहेर जावे लागले. वैद्यकीय पथक त्याच्यावर उपचार करत आहे.

00:43 (IST)12 Jul 2021
इटलीला फ्री किक

आठव्या मिनिटाला इटलीला फ्री किक मिळाली. पण चिसाने मारलेला फटका गोलपोस्टच्या वरून गेला.

00:35 (IST)12 Jul 2021
पहिल्या पाच मिनिटात इंग्लंडचा पहिला गोल

लुका शॉने दुसऱ्याच मिनिटाला इंग्लंडसाठी गोल करत आघाडी घेतली आहे. हा यंदाच्या स्पर्धेतील सर्वात जलद गोल ठरला.

00:26 (IST)12 Jul 2021
दोन्ही संघांची रणनिती

या सामन्यात मैदानात इटलीने खेळाडूंची ४-३-३ आणि इंग्लंडने ३-४-२-१ अशी व्यूहरचना आखली आहे.

00:06 (IST)12 Jul 2021
इटलीचा संघ
00:05 (IST)12 Jul 2021
इंग्लंडचा संघ
23:09 (IST)11 Jul 2021
यूरो कपमध्ये दोन्ही संघ

इटलीचा संघ चौथ्यांदा, तर इंग्लंड प्रथमच युरो चषकाच्या अंतिम फेरीत खेळत आहे. यापूर्वी इटलीने १९६८ मध्ये ही स्पर्धा जिंकली असून, २००० आणि २०१२ मध्ये त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

23:07 (IST)11 Jul 2021
आकडेवारी काय सांगते?
23:06 (IST)11 Jul 2021
आजच्या सामन्यात कोण करणार दमदार प्रदर्शन?
23:05 (IST)11 Jul 2021
लंडनचे वेम्बली स्टेडियम सज्ज

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Euro cup final 2020 england vs italy match live updates adn

Next Story
रसिका , सारा , सुधांशु, आदित्य यांची विजयी सलामी
ताज्या बातम्या