१६ जून ते १९ जून या कालावधीमध्ये मॅसॅच्युसेट्समधील ब्रुकलाइन येथे युएस खुल्या गोल्फ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा गोल्फमधील सर्वात कठीण स्पर्धा म्हणून ओळखली जाते. परंतु, गेल्या काही आठवड्यांत गोल्फमध्ये कमालीच्या घडामोडी घडल्या. त्या बघता या संपूर्ण काळाचा ‘गोल्फची सर्वात कठीण परीक्षा’ असे म्हटले तरी चूकीचे ठरणार नाही. यूएस-आधारित पीजीए टूर जगातील सर्वात कठीण, सर्वात प्रतिष्ठित आणि सर्वात किफायतशीर गोल्फ सर्किट आहे. बहुतेक नवोदित खेळाडू तर याला ‘होली ग्रेल’चा मान देतात. पीजीए टूरने गेल्या अनेक दशकांपासून डीपी वर्ल्ड टूरसोबत गोल्फ क्षेत्रावर वर्चस्व गाजवले आहे.

आता, एका सरकारी गुंतवणूक निधी उपक्रमाने या प्रतिष्ठित गोल्फ स्पर्धांची यथास्थिती धोक्यात आणली आहे. सौदी उपक्रमाने जगातील सर्वोत्तम खेळाडूंना किफायतशीर करार आणि एलआयव्ही गोल्फ स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी आकर्षक बक्षीस रकमेची हमी दिली आहे. काही अग्रगण्य गोल्फपटूंनी या उपक्रमात स्वारस्य दाखवले आहे. ही एक प्रकारची बंडखोरी असूनही पीजीए टूरने खेळाडूंचे सदस्यत्व निलंबित करण्यात थोडा वेळ घेतला आहे.

gukesh d creates history becomes youngest Player to win fide candidates title zws
गुकेशला ऐतिहासिक जेतेपद; नामांकितांना मागे सोडत ‘कँडिडेट्स’मध्ये अजिंक्य; जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी पात्र
kasturi cotton
कस्तुरी कॉटन…देशातील सर्वोत्तम कापूस!
Israel use of AI in war revealed in reports by Israeli and Palestinian journalists
इस्रायलकडून युद्धात ‘एआय’चा वापर? इस्रायली आणि पॅलेस्टिनी पत्रकारांच्या अहवालात खुलासा
Vidit Gujarathi defeated Hikaru Nakamura in the Chess Candidates competition sport news
विदितचा नाकामुराला धक्का; गुकेशचा प्रज्ञानंदवर विजय; हम्पीची सलग दुसरी बरोबरी

ज्या काही मोठ्या नावांनी सौदीसोबत जाण्याचा पर्याय निवडला आहे ते यूएस खुल्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यास मोकळे आहेत. शिवाय, पुढील महिन्यात गोल्फचे माहेर मानल्या जाणाऱ्या सेंट अँड्र्यूज येथील ओल्ड कोर्सवरील १५०वी खुली चॅम्पियनशिप खेळण्यासही ते मोकळे असतील. मात्र, भविष्यातील रायडर कप किंवा प्रेसिडेंट्स चषकांमध्ये त्यांना सहभागी होऊ दिले जाणार नाही असे चित्र निर्माण होताना दिसत आहे.

हे प्रकरण नेमके काय आहे ?

सौदी अरेबियातील सरकारी गुंतवणूक निधीच्या (पीआयएफ) मदतीने उच्चभ्रू खेळांवर खूप पैसा खर्च करण्यात येत आहे. सौदी सत्ताधारी राजवटीची प्रतिमा उंचावण्यासाठी असे केले जात असल्याचे आरोप समिक्षकांनी केले आहेत. या प्रक्रियेला ‘स्पोर्ट्सवॉशिंग’ असे संबोधण्यात आले आहे. सौदीवर मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याचे अनेक आरोप आहेत. वॉशिंग्टन पोस्टचे पत्रकार जमाल खशोग्गी यांच्या हत्येनंतर तर हे आरोप आणखी प्रकर्षाने समोर आले. अमेरिकेतील ९/११च्या हल्ल्यातील १० अपहरणकर्त्यांपैकी १५ हे सौदी अरेबियाचे होते. अशा स्थितीत सौदीने प्रस्थापित यूएस-आधारित दौर्‍याविरुद्ध प्रतिस्पर्धी गोल्फ उपक्रम सुरू केल्याने तणाव आणखी वाढला आहे. पीजीए टूरने आपल्या खेळाडूंना एलआयव्ही गोल्फ स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी सूट देण्यास नकार दिला आहे. काही खेळाडूंनी भविष्यातील मंजुरीची प्रक्रिया किंवा खटला टाळण्यासाठी त्यांच्या सदस्यत्वाचा राजीनामाही दिला आहे.

सौदीतील एलआयव्हीचे स्वरूप कसे आहे?

एलआयव्ही म्हणजे रोमन अंकांतील ५४ हा आकडा आहे. या टूर्नामेंटमध्ये ५४ होल असतील आणि ती तीन दिवस खेळवली जाईल. याउलट, पारंपारिक टूरमध्ये ७२ होल असतात आणि त्या चार दिवस खेळवल्या जातात. एलआयव्हीतील प्रत्येक इव्हेंटमध्ये ४८ खेळाडू असतात. एक सांघिक आणि एक वैयक्तिक स्पर्धा खेळवली जाते. संघांमध्ये प्रत्येकी चार सदस्य असतात. खेळाडू एकाच वेळी ‘शॉटगन स्टार्ट’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या वेगवेगळ्या छिद्रांवर टी ऑफ करतात.

सौदीने अग्रगण्य गोल्फपटूंना किती रक्कम देऊ केली आहे?

एलआयव्हीमध्ये सामील होण्यासाठी गोल्फमधील सर्वात आघाडीच्या आणि प्रसिद्ध नावांना लाखो डॉलर्सची रक्कम देऊ केली आहे. एलआयव्ही गोल्फने २०२२ मध्ये आठ स्पर्धांचे नियोजन केले आहे. त्यापैकी प्रत्येकासाठी २५ दशलक्ष डॉलर्सचा बक्षीस निधी असेल. पीजीए टूरवरील कोणत्याही स्पर्धेत मिळणाऱ्या रकमेपेक्षा ही रक्कम अधिक आहे. अंतिम इव्हेंटमधील विजेत्या संघाला १६ दसलक्ष डॉलर्सची रक्कम मिळेल. विशेष म्हणजे या स्पर्धेत शेवटचे स्थान मिळवणाऱ्या खेळाडूलाही एक लाख २० हजार डॉलर्स मिळतील.

एलआयव्हीमध्ये कोण-कोण सामील झाले आहे?

डस्टिन जॉन्सन, ब्रायसन डीचॅम्बेउ, पॅट्रिक रीड, चार्ल श्वार्टझेल, लुई ओस्थुइझेन, इयान पॉल्टर, ग्रॅम मॅकडोवेल आणि फिल मिकेलसन ही एलआयव्ही गोल्फ रोस्टरमधील काही प्रमुख नावे आहेत. “आम्ही गोल्फपटू आहोत राजकारणी नाही. जर सौदी अरेबियाला गोल्फच्या खेळाचा उपयोग त्यांना पाहिजे त्या ठिकाणी पोहोचण्याचा एक मार्ग म्हणून करायचा असेल, तर त्या प्रवासात त्यांना मदत केल्याचा आम्हाला अभिमान आहे,” मॅकडॉवेल म्हणाला आहे.

यूएस ओपनच्या मैदानात अजूनही एलआयव्ही गोल्फ खेळाडू असण्याचे कारण काय?

गोल्फ प्रतिष्ठानने अधिकृत टूर सोडून देणाऱ्या आघाडीच्या नावांवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. परंतु, यूएस ओपन स्पर्धा ही युनायटेड स्टेट्स गोल्फ असोसिएशनद्वारे (यूएसजीए) आयोजित केली जाते. अशा परिस्थितीमध्ये एलआयव्हीमधील गोल्फपटूंना तिथे खेळण्याची संधी नाकारणे हे त्यांच्या गुणवत्तेवर अन्याय केल्यासारखे आहे. त्यामुळे काही खेळाडूंना यूएस ओपन स्पर्धेत सहभागी होण्यास संधी देण्यात आली आहे.

गोल्फप्रमाणे इतर कोणत्या खेळ सौदीच्या निशाण्यावर आहेत?

जर एखाद्याला फार कमी खेळ खेळून भरपूर पैसे मिळवता येत असतील तर खेळाडू सहज कोणत्याही स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. सौदी अरेबिया आपली प्रतिमा सुधारण्यासाठी गोल्फप्रमाणे टी २० क्रिकेटचाही वापर करू शकतो, असे म्हटले जात आहे.