scorecardresearch

एफए चषक फुटबॉल स्पर्धा : मानेच्या गोलमुळे लिव्हरपूल अंतिम फेरीत

आघाडीपटू सादिओ मानेने केलेल्या दोन गोलच्या बळावर लिव्हरपूलने मँचेस्टर सिटीला ३-२ असे नमवत ‘एफए चषक’ फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.

लंडन : आघाडीपटू सादिओ मानेने केलेल्या दोन गोलच्या बळावर लिव्हरपूलने मँचेस्टर सिटीला ३-२ असे नमवत ‘एफए चषक’ फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. लंडनच्या वेम्बली स्टेडियमवर झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यातील पूर्वार्धात लिव्हरपूलने अप्रतिम खेळ केला. नवव्या मिनिटाला बचावपटू इब्राहिमा कोनाटेने हेडरद्वारे केलेल्या गोलमुळे लिव्हरपूलचे खाते उघडले. मग मानेने (१७ , ४५वे मिनिट) दोन गोलची भर घातल्याने मध्यांतराला लिव्हरपूलकडे ३-० अशी आघाडी होती. उत्तरार्धात मात्र सिटीने अधिक आक्रमक शैलीत खेळ केला. सिटीकडून जॅक ग्रिलिशने ४७व्या मिनिटाला, तर बर्नाडरे सिल्वाने ९० मिनिटांनंतरच्या भरपाई वेळेत गोलही केले. पण अखेरच्या मिनिटांत लिव्हरपूलचा गोलरक्षक अ‍ॅलिसनने चांगला खेळ केल्याने सिटीला २-३ असा पराभव पत्करावा लागला.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fa cup football tournament liverpool reach final due to mane goal ysh

ताज्या बातम्या