Odisha Train Tragedy Fact Check: ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहनगा येथे नुकत्याच झालेल्या भीषण रेल्वे अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. दरम्यान, अनेक सेलिब्रिटी आणि खेळाडूंनी रेल्वे दुर्घटनेत बळी पडलेल्यांसाठी मोठी रक्कम दान केल्याचे वृत्त आहे. चेन्नई सुपर किंग्जचा स्टार आणि भारताचा माजी कर्णधार एम.एस. धोनीने ओडिशा ट्रेन दुर्घटनेतील पीडितांसाठी ६० कोटी रुपयांची देणगी दिली आहे, दुसरीकडे विराट कोहली आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये असून त्याने ३० कोटी रुपये दिल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. मात्र, ही पूर्णपणे चुकीची आहे याला कुठलाही आधार नाही.

सोशल मीडियावर ही बातमी वाऱ्यासारखी पसरत आहे. मात्र, जेव्हा विश्वासार्ह वृत्तपत्र लोकसत्ताने त्याची सत्यता तपासली तेव्हा आणखी एक गोष्ट समोर आली की, महेंद्रसिंग धोनीने ओडिशा ट्रेन दुर्घटनेतील पीडितांसाठी ६० कोटी रुपयांची देणगी दिल्याचा दावा पूर्णपणे फसवा आहे. एम.एस. धोनीने ओडिशा ट्रेन दुर्घटनेतील पीडितांसाठी ६० कोटी रुपये किंवा एवढी मोठी रक्कम देण्याची घोषणा कधीच केली नाही. त्याचप्रमाणे कोहलीनेही ३० कोटी दिले अशी कोणत्याही प्रकारची माहिती नाही. हे वृत्त अतिशय निरर्थक असून फॅक्ट चेकमध्ये ही माहिती चुकीचे असल्याचे समोर आले आहे.

Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
Why MHADA will not build houses in high income group
म्हाडाकडून यापुढे उच्च उत्पन्न गटातील घरांची निर्मिती नाही?
MP Supriya Sule criticized the leaders who left NCP
“रिश्ता तोडना आसान है, निभाना मुश्किल है…” राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर खासदार सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका
SECR Recruitment 2024 jobs at railway
SECR Recruitment 2024 : रेल्वेमध्ये ‘या’ पदांसाठी मोठ्या संख्येने होणार भरती! अधिक माहिती पाहा

टेलिग्राम, व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पसरवलेला हा बनावट संदेश आहे. दुसरीकडे, अनेक ट्विटर वापरकर्ते या भीषण अपघाताला ‘जातीय रंग’ देत असल्याचे दिसत आहे. बनावट ट्विटची दखल घेत ओडिशा पोलिसांनी अशा पोस्टवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा दिला.

ओडिशा पोलिसांच्या वतीने, असे निदर्शनास आले आहे की काही सोशल मीडिया हँडल बालासोरमधील दुःखद रेल्वे अपघाताला जातीय रंग देत आहेत. हे अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही सर्व संबंधितांना आवाहन करतो की अशा खोट्या आणि दुर्भावनापूर्ण पोस्ट प्रसारित करणे टाळावे. अफवा पसरवून जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

हेही वाचा: WTC Final: सामन्याच्या पहिल्याच दिवशी सिराज-लाबुशेन भिडले! चाहते म्हणतात, क्रिकेट सोडून WWE… Video व्हायरल

क्रीडा पत्रकारांनीही याला ‘फेक न्यूज’ म्हटले आहे. विराट कोहलीने ओडिशा दुर्घटनेतील मृतांसाठी ३० कोटी रुपयांची मदत दिल्याच्या चर्चेत तथ्य नसल्याचेही ते म्हणाले. व्हायरल दाव्याच्या तपशीलासाठी त्यांनी लंडनमध्ये खेळत असलेल्या विराट कोहलीला काहींनी फोन केला त्यावर त्याने अशी कुठलीही मदत केली नाही असे त्याने सांगितले.

हेही वाचा: WTC Final IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील WTC फायनल कोण जिंकणार? वसीम अक्रमने केले भाकित; म्हणाला, “संयम ठेवला तर…”

भारतीय संघाने आजपर्यंत आयसीसीच्या स्पर्धांच्या ११ फायनल खेळल्या आहेत. ज्यात आयसीसी विश्वचषक, आयसीसी टी२० विश्वचषक, आयसीसी वनडे चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आयसीसी कसोटी चॅम्पियनशीपचा समावेश आहे. १९८३ साली वनडे विश्वचषक, २००० व २००१ साली चॅम्पियन्स ट्रॉफी, २००३ साली विश्वचषक, २००७ साली टी२० विश्वचषक, २०११ साली वन डे विश्वचषक, २०१३ साली चॅम्पियन्स ट्रॉफी, २०१४ साली टी२० विश्वचषक, २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी, २०२१ कसोटी चॅम्पियनशीप आणि सध्या सुरु असलेली कसोटी चॅम्पियनशीप अशा फायनलचा समावेश होतो.