Video: शाहीन आफ्रिदीकडे भारत-पाकिस्तान सामन्याचं तिकीट मागताच त्याने केलं असं की…!

टी २० वर्ल्डकप स्पर्धेत क्रीडाप्रेमींना भारत-पाकिस्तान सामन्याचे वेध लागले आहेत. भारत पाकिस्तान म्हटलं की, दोन्ही देशांकडून वाकयुद्ध सुरु होतं.

Shaheen_Afridi_Viral_Video
Video: शाहीन आफ्रिदीकडे भारत-पाकिस्तान सामन्याचं तिकीट मागताच त्याने केलं असं की…! (Photo- Viral Video/ Indian Express)

टी २० वर्ल्डकप स्पर्धेत क्रीडाप्रेमींना भारत-पाकिस्तान सामन्याचे वेध लागले आहेत. भारत पाकिस्तान म्हटलं की, दोन्ही देशांकडून वाकयुद्ध सुरु होतं. भारत पाकिस्तान सामना २४ ऑक्टोबरला होणार आहे. यापूर्वी भारत पाकिस्तान सामना २०१९ वर्ल्डकपमध्ये खेळला गेला होता. हा सामना भारताने जिंकला होता. त्यात भारताने पाकिस्तानला वर्ल्डकपमध्ये वारंवार पराभूत केलं आहे. त्यामुळे टी २० वर्ल्डकपमध्ये होणाऱ्या सामन्यात काय होणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहीन आफ्रिदीकडे एका व्यक्तीने सामन्याचं तिकीट मागितलं. त्यानंतर त्याने दिलेल्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

शाहीन रस्त्यावरून जात असताना एका व्यक्तीने त्याला हाक मारली आणि भारत पाकिस्तान सामन्याचं तिकीट आहे का?, असं विचारलं. त्यानंतर शाहीनने आपल्या खिशात हात घातला आणि तिकीट दाखवण्याचा प्रयत्न केला. खरं तर शाहिनने आपल्या खिशात हात टाकत चाहत्याला चिडवण्याचा प्रयत्न केला.

सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये ७० टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. आयसीसी आणि यजमान बीसीसीआयला यूएई सरकारकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. या सामन्यासाठी सर्वात महाग तिकिटाचा दर हा २ लाख रुपये इतकं आहे. सामान्य तिकिटापेक्षा ३३३ टक्के अधिक किमत आहे. वेगवेगळ्या स्टँडसाठी वेगवेगळी किमत आहे. तिकिटाची सुरुवात १२,५०० पासून आहे. या व्यतिरिक्त ३१,२०० आणि ५४,१०० रुपयात क्रिकेटप्रेमी प्रीमियम आणि प्लॅटिनम स्टँडचं तिकीट खरेदी करू शकतात. सर्व कॅटेगरीची तिकिटं संपली आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Fan ask for india pakistan match shaheen afridi reaction video viral rmt

Next Story
ऑलिम्पिक पदकात पुण्याचाही वाटा -सायना
ताज्या बातम्या