Rohit Sharma Fan Viral Video: भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्मा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे.रोहितने टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे तो केवळ आयपीएल आणि वनडे क्रिकेट खेळताना दिसून येतो. पण जेव्हा तो मैदानात खेळण्यासाठी उतरतो, त्यावेळी त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते तुफान गर्दी करतात. रोहित शर्माच्या जबरा फॅनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जो १८०० किमी सायकलने प्रवास करुन मुंबईत रोहितला भेटण्यासाठी आला आहे. भेटीनंतर त्याने रोहितला एक खास गिफ्ट देखील दिलं आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान होत आहे, ज्यात तुम्ही पाहू शकता की ओडिशा येथे राहणारा सुनील नावाच फॅन १८०० किमी सायकलने प्रवास करुन रोहित शर्माला भेटण्यासाठी आणि त्याला शुभेच्छा देण्यासाठी मुंबईत दाखल झाला आहे. सुनील ओडिशा येथे क्रेन ऑपरेटरचं काम करतो. त्याचे वडील शेतकरी आहेत. त्याची एकच ईच्छा होती, ती म्हणजे आपला आवडता खेळाडू रोहित शर्माला भेटायचं आणि त्यालला आगामी वनडे वर्ल्डकप २०२७ स्पर्धेसाठी शुभेच्छा द्यायचं. रोहितची भेट घेऊन त्याला आगामी वर्ल्डकप स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
सायकल खरेदी केली अन् मुंबई गाठली
माध्यमातील वृत्तानुसार, सुनीलने मेहनत करुन ८००० जमवले आणि सायकल खरेदी केली. १५ दिवसाआधी तो तो मुंबई गाठण्यासाठी ओडिशाहून सायकल घेऊन निघाला. सुनीलने सांगितलं की,या प्रवासादरम्यान अनेकांनी त्याला २०० आणि ५०० रुपये देऊन मदत करण्याचा प्रयत्न केला. पण त्याने कोणाकडूनही पैसे घेतले नाहीत. या प्रवासादरम्यान अनेक अडथळे आले, पाऊस आला, जंगलातून प्रवास करावा लागला. पण त्याने माघार घेतली नाही. आपल्या आवडत्या खेळाडूला भेटण्याची जिद्द मनात ठेवून तो पुढे चालत राहिला.
मुंबईत पोहोचल्यानंतर त्याने रोहित शर्माची भेट घेतली. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सुनीलने रोहित शर्माची भेट घेतली आणि रोहितला जगन्नाथांची मूर्ती भेट म्हणून दिली. रोहितने या मूर्तीचा स्वीकार केला आणि त्याच्यासोबत फोटो क्लिक केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
