scorecardresearch

पेलेंच्या अंत्यसंस्कारासाठी चाहत्यांची अलोट गर्दी

सर्वकालीन महानतम फुटबॉलपटूंपैकी एक पेले यांच्या अंत्यसंस्कारासाठी सॅण्टोस येथील विला बेलमिरो मैदानाबाहेर सोमवारपासूनच चाहत्यांनी गर्दी करायला सुरुवात केली.

पेलेंच्या अंत्यसंस्कारासाठी चाहत्यांची अलोट गर्दी

सॅण्टोस (ब्राझील) : सर्वकालीन महानतम फुटबॉलपटूंपैकी एक पेले यांच्या अंत्यसंस्कारासाठी सॅण्टोस येथील विला बेलमिरो मैदानाबाहेर सोमवारपासूनच चाहत्यांनी गर्दी करायला सुरुवात केली. पेलेंच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. प्रदीर्घ आजारानंतर पेले यांचे गेल्या गुरुवारी निधन झाले होते.

पेले यांनी कारकीर्दीतील काही सर्वोत्तम गोल विला बेलमिरो मैदानावरच नोंदवले होते. या मैदानापासून जवळच असणाऱ्या वर्टिकल दफनभूमीत पेलेंचे पार्थिव दफन केले जाणार आहे. पेलेंच्या पार्थिवावरील अंत्यसंस्कारास स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी पेलेंचे चाहते सोमवारपासून मैदानावर येण्यास सुरुवात झाली.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-01-2023 at 03:40 IST

संबंधित बातम्या