माजी पाक क्रिकेटपटू वासिम अक्रमला मँचेस्टर विमानतळावर अपमानास्पद वागणूक

सोशल मीडियावर व्यक्त केली नाराजी

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वासिम अक्रमला मँचेस्टर विमानतळावर, स्थानिक अधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळाली आहे. खुद्द अक्रमने आपल्या ट्विटर हँडलवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. विमानतळावरील अधिकाऱ्यांनी आपल्याशी उद्धटपणे बोलत, माझ्याजवळील औषधांची योग्य काळजी घेतली नसल्याचा आरोप वासिम अक्रमने केला आहे.

वासिम अक्रम हा मधुमेहाच्या आजाराने त्रस्त आहे. यासाठी डॉक्टरांनी दिलेली औषध तो नेहमी आपल्या जवळ बाळगतो. मात्र मँचेस्टर विमानतळावरील अधिकाऱ्यांनी अक्रमशी उद्धटपणे बोलत त्याला त्याची औषधं प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवण्यास सांगितलं. आपल्यासाठी हा प्रकार अपमानास्पद असल्याचं अक्रमने म्हटलं आहे.

१९९७ सालपासून वासिमला मधुमेहाचा त्रास आहे. त्यावेळपासून वासिम अक्रम आपल्याजवळ डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधं आणि इंजेक्शन जवळ बाळगतो. दरम्यान या प्रकरणी विमानतळ अधिकाऱ्यांकडून कोणतीही प्रतिक्रीया आलेली नाहीये.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Felt embarrassed and humiliated at manchester airport says wasim akram psd

Next Story
विजयी भव !
ताज्या बातम्या