टी-२० वर्ल्डकपला सुरुवात होताच भारताला बसला ‘जबर’ धक्का!

‘‘टी-२० विश्वचषक स्पर्धा ही भारतीय संघासोबतची माझी शेवटची स्पर्धा असेल.”

fielding coach r sridhar announces his final good bye to indian cricket team
आर. श्रीधर यांनी भारतीय संघासोबतचा प्रवास थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

टी-२० वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होताच भारतीय संघाला धक्का बसला आहे. भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांनी संघाला गूडबाय करणार असल्याचे जाहीर केले. टी-२० विश्वचषक स्पर्धा ही भारतीय संघासोबतची शेवटची स्पर्धा असल्याचे श्रीधर यांनी सांगितले. इन्स्टाग्रामद्वारे त्यांनी ही माहिती दिली. जवळपास सात वर्षे टीम इंडियाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम केले आहे.

श्रीधर यांनी इन्स्टाग्रामवर भारतीय संघाच्या प्रशिक्षण जर्सीमध्ये त्यांचा फोटो अपलोड केला. ”मी भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून माझे अंतिम काम करणार आहे. मला २०१४ ते २०२१ पर्यंत टीम इंडियाची सेवा करण्याची परवानगी दिल्याबद्दल मी बीसीसीआयचे आभार मानू इच्छितो. माझा विश्वास आहे, की मी माझे काम पूर्ण उत्कटतेने, प्रामाणिकपणे आणि माझ्या सर्वोत्तम क्षमतेने पूर्ण केले आहे. होय, अधूनमधून चुका झाल्या पण प्रत्येक चुकीचा फायदा संघाला चांगल्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी घेतला गेला”, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले.

हेही वाचा – BCCI चिंतेत..! द्रविडची जागा घेण्यास भारताच्या ‘दिग्गज’ खेळाडूनं दिला नकार

आर. श्रीधर यांनी संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, माजी कर्णधार एमएस धोनी आणि कर्णधार विराट कोहलीसह त्यांचे सहकारी सदस्य आणि इतर खेळाडूंचे आभार मानले. ”रवी शास्त्री एक प्रेरणादायी गुरु आहेत, त्यासाठी मी त्यांचा ऋणी आहे. माजी कर्णधार धोनी आणि सध्याचा कर्णधार विराट कोहली यांचेही खूप आभार, ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला”, असेही श्रीधर यांनी म्हटले.

२४ ऑक्टोबरला भारत आपल्या टी-२० वर्ल्डकप मोहिमेची सुरुवात करणार आहे. भारत आपला पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Fielding coach r sridhar announces his final good bye to indian cricket team adn

ताज्या बातम्या