दोहा : विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या शुक्रवारी होणाऱ्या कार्यक्रमपत्रिका निश्चिती सोहळय़ासाठी गुरुवारी ‘फिफा’कडून चार विभागरचनेनुसार संघ जाहीर करण्यात आले आहेत.

यात मेक्सिको व अमेरिका यांना दुसऱ्या विभागात स्थान देण्यात आले आहे. पनामाकडून पराभूत झाल्यामुळे कॅनडाचा संघ तिसऱ्या विभागाऐवजी चौथ्या विभागात असेल. पहिल्या विभागात यजमान कतारसह गुरुवारी ‘फिफा’ने जाहीर केलेल्या जागतिक क्रमवारीतील सात बलाढय़ संघांचा समावेश असेल. चौथा विभागवगळता इतर विभागातील संघ जागतिक क्रमवारीनुसार सहभागी होतील. चौथ्या विभागात क्रमवारीनुसार पाच देशांसह उर्वरित तीन पात्रता फेरीचे संघ सहभागी होतील. चार विभागांतील एक संघ प्रत्येक गटात असेल. आठपैकी पाच गटांत जास्तीत जास्त दोन युरोपियन संघ असतील.

विभाग

विभाग १ : कतार (यजमान),ब्राझील, बेल्जियम, फ्रान्स, अर्जेटिना, इंग्लंड, स्पेन, पोर्तुगाल.

विभाग २ :   मेक्सिको, नेदरलँड्स, डेन्मार्क, जर्मनी, उरुग्वे, स्वित्झर्लंड, अमेरिका, क्रोएशिया.

विभाग ३ : सेनेगल, इराण, जपान, मोरोक्को,सर्बिया, पोलंड, दक्षिण कोरिया, टय़ूनिशिया.

विभाग ४ :  कॅमरून, कॅनडा, एक्वाडोर, सौदी अरेबिया, घाना, पेरू/ऑस्ट्रेलिया/संयुक्त अरब अमिराती, कोस्टा रिका/न्यूझीलंड, वेल्स/स्कॉटलंड/युक्रेन.

’ वेळ : रात्री ९.३० वाजता ’  थेट प्रक्षेपण : व्हूट, हिस्ट्री टीवी १८