दोहा : ‘फिफा’ आणि यजमान कतार यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी जाहीर होणाऱ्या आगामी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या कार्यक्रमपत्रिकेकडे जगभरातील चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

तीन वर्षे चालणाऱ्या विश्वचषक  पात्रता प्रक्रियेला विलंब झाल्यामुळे  आणि ती अजूनही सुरू असल्यामुळे स्पर्धेतील ३२ देशांपैकी तीन संघ अजूनही निश्चित झालेले नाहीत. करोना प्रादुर्भाव आणि रशिया-युक्रेन युद्ध ही यामागची काही प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या कार्यक्रमात ३७ देशांचा सहभाग असेल. यापैकी पाच संघ नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होणार नाहीत. कतारमध्ये आंतरखंडीय पात्रता फेरी झाल्यानंतर १४ जूनला उर्वरित संघांबाबतचे चित्र स्पष्ट होईल.

Rohit Sharma statement regarding the World Cup 2027 sport news
पुढील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळण्यास उत्सुक! इतक्यातच निवृत्तीचा विचार नाही; रोहितचे वक्तव्य
Gautam Gambhir Praises MS Dhoni
IPL 2024 CSK vs KKR : चेन्नईविरुद्धच्या सामन्यापूर्वी गंभीरचं मोठं वक्तव्य; म्हणाला, “धोनी हा एक कुशल…”
ben stoke
बेन स्टोक्सची ट्वेन्टी-२० विश्वचषकातून माघार
Virat Kohli and Rachin Ravindra Video Viral
CSK vs RCB : सामन्यादरम्यान कोहलीने पुन्हा उत्साहात गमावले भान, रचिन बाद झाल्यावर अशी दिली प्रतिक्रिया, पाहा VIDEO

कार्यक्रमपत्रिका निश्चितीचे नियम

* यजमान कतार संघाला ‘अ’ गटात अग्रमानांकन देण्यात आले आहे. त्यांचे ‘अ-१’ असे स्थान असेल. कतार सध्या ‘फिफा’च्या जागतिक क्रमवारीत ५२व्या स्थानी आहे. याआधी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत हा संघ खेळलेला नाही. त्यांचा पहिला सामना २१ नोव्हेंबरला अल बैत स्टेडियम येथे होईल. 

* ब्राझील, बेल्जियम, फ्रान्स, अर्जेटिना, इंग्लंड, स्पेन, पोर्तुगाल या जागतिक क्रमवारीतील पहिल्या सात क्रमांकांच्या संघांना विभाग-१मध्ये स्थान देण्यात आले असून त्यांची विभागणी ‘ब’ ते ‘ह’ या गटात होईल. मानांकनांचे विभाग हे ’फिफा’च्या क्रमवारीनुसार ठरतील. ही यादी गुरुवारी जाहीर होईल.

* क्रमवारीतील पुढील सर्वोत्तम आठ क्रमांकांच्या पात्र संघांना (८ ते १५ क्रमांक) विभाग-२ मध्ये स्थान दिले जाईल. या विभागात जर्मनीचा समावेश असेल. याशिवाय बुधवारच्या पात्रता लढतीनंतर अमेरिका आणि मेक्सिकोचाही समावेश होऊ शकेल.

* विभाग-३ मध्ये क्रमवारीतील पुढील आठ संघांना (१६ ते २३ क्रमांक) स्थान दिले आहे.

* विभाग-४ मध्ये २४ ते २८ क्रमांकांच्या संघांना स्थान दिले जाईल. ३६ वर्षांनंतर विश्वचषकासाठी पात्र ठरलेला कॅनडाचा संघ या विभागात असेल. याशिवाय तीननंतर पात्र होणाऱ्या संघांचाही या विभागात समावेश असेल.

वेळ : रात्री १०.३० वा. ’ थेट प्रक्षेपण : व्हूट सिलेक्ट, हिस्टरी टीव्ही १८