scorecardresearch

FIFA WC 2022:  माजी विश्वविजेत्या जर्मनीसह सात संघांचे आज ठरणार भवितव्य, कोणते चार संघ अंतिम १६ मध्ये पोहोचणार

फिफा विश्वचषकात आज चार सामने होणार असून माजी विश्वविजेते जर्मनीसह सात संघांचे आज भवितव्य ठरणार आहे. सातपैकी चार संघ अंतिम १६ मध्ये पोहोचतील.

FIFA WC 2022:  माजी विश्वविजेत्या जर्मनीसह सात संघांचे आज ठरणार भवितव्य, कोणते चार संघ अंतिम १६ मध्ये पोहोचणार
सौजन्य- (लोकसत्ता ग्राफिक्स)

फिफा विश्वचषक २०२२ चा आज १३वा दिवस आहे. आजही या स्पर्धेत चार सामने खेळवले जाणार आहेत. ग्रुप एफ आणि ग्रुप ई संघ आज आपले शेवटचे सामने खेळतील. पहिल्या गटात क्रोएशियाचा सामना बेल्जियमशी तर कॅनडाचा सामना मोरोक्कोशी होणार आहे. हे दोन्ही सामने भारतीय वेळेनुसार रात्री ८.३० वाजता सुरू होतील. यानंतर इ गटात स्पेनचा सामना जपानशी तर कोस्टारिकाचा सामना जर्मनीशी होणार आहे.

क्रोएशियासमोर बेल्जियमचे आव्हान

फिफा विश्वचषक स्पर्धेतील ‘एफ’ गटातील सामन्यात बेल्जियमचा सामना गुरुवारी स्टार्सने भरलेल्या गतविजेत्या क्रोएशियाशी होणार आहे. या सामन्यात स्टार खेळाडू आमनेसामने असतील आणि दोन्ही संघ पुढील फेरी गाठण्यासाठी जोर लावतील. क्रोएशिया एक विजय किंवा ड्रॉसह राऊंड १६ च्या फेरीत प्रवेश करू शकतो, तर बाद फेरीत स्थान निश्चित करण्यासाठी बेल्जियमला ​​जिंकणे आवश्यक आहे. एफ गटात क्रोएशिया आणि मोरोक्को प्रत्येकी चार गुणांसह पहिले दोन आहेत. बेल्जियमचे तीन गुण आहेत तर कॅनडाचे खातेही अद्याप उघडलेले नाही.

कॅनडाने मोरोक्कोवर मात केल्यास क्रोएशिया आणि बेल्जियम हे दोघेही बाद फेरीत जाण्याची शक्यता आहे. क्रोएशियाकडे लुका मॉड्रिक, मार्सेलो ब्रोझोविक आणि माटेओ कोव्हासिक हे खेळाडू आहेत, तर बेल्जियम अनुभवी स्ट्रायकर एडन हॅझार्ड, केविन डी बुएन आणि रोमेलू लुकाकूवर अवलंबून आहे.

हेही वाचा :   FIFA World Cup 2022:  धक्कादायक! फिफा विश्वचषकात ट्रेनिंग दरम्यान २२ वर्षीय फुटबॉलपटूचा मृत्यू

मोरोक्कोला विजयासह अंतिम-१६ मध्ये पोहोचायचे आहे

एफ ग्रुपमधील आजचा दुसरा सामना मोरोक्को आणि कॅनडा यांच्यात आहे. कॅनडाने आपले सुरुवातीचे दोन्ही सामने गमावले होते आणि हा संघ अंतिम-१६ शर्यतीतून बाहेर पडला आहे. त्याचवेळी, मोरक्कन संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. या संघाने एक सामना जिंकला असून एक सामना अनिर्णित ठेवला आहे. आपला शेवटचा सामना जिंकून मोरोक्कोला अंतिम १६ मध्ये आपले स्थान निश्चित करायचे आहे. हे दोन्ही संघ प्रथमच एकमेकांशी खेळत आहेत, मात्र या स्पर्धेत आतापर्यंत मोरोक्कोची कामगिरी कॅनडाच्या तुलनेत खूपच चांगली झाली आहे. या आधारावर मोरोक्कोच्या विजयाची शक्यता जास्त आहे.

स्पेनला पुढील फेरीसाठी पात्र ठरण्यासाठी विजय आवश्यक

आज इ गटातील स्पेनचा शेवटचा सामना जपानविरुद्ध आहे. या संघाने दोनपैकी एक सामना जिंकला आहे, तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. स्पेन चार गुणांसह गटात अव्वल स्थानावर आहे. यासोबतच जपानचा संघ दोन सामन्यांत एक पराभव आणि एक विजयासह दुसऱ्या स्थानावर आहे. हा सामना गमावल्यास जपानचा संघ अंतिम १६ मधून बाहेर पडू शकतो. त्याचवेळी स्पेन हरल्यास कोस्टा रिकालाही अंतिम-१६ मध्ये जाण्याची संधी असेल. दोन्ही संघ प्रथमच एकमेकांविरुद्ध खेळत आहेत, परंतु कागदावर, स्पॅनिश संघ जपानच्या तुलनेत खूपच मजबूत आहे.

हेही वाचा :   BCCI CAC: बीसीसीआयने क्रिकेट सल्लागार समितीसाठी तीन सदस्यांची केली निवड, टीम इंडियाच्या या माजी खेळाडूंना स्थान

अंतिम-१६ मध्ये जाण्यासाठी जर्मनीला जपानचा पराभव आवश्यक

चारवेळचा चॅम्पियन जर्मनी गुरुवारी येथे फिफा विश्वचषक स्पर्धेतील त्यांच्या गट ई सामन्यात कोस्टा रिकाशी भिडणार आहे. बाद फेरी गाठण्यासाठी जर्मनीला कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागेल. याशिवाय त्याला गटातील दुसऱ्या सामन्यात जपानविरुद्ध स्पेनच्या विजयासाठी प्रार्थना करावी लागणार आहे. जपानला पराभूत केल्यानंतर, कोस्टा रिकाचे मनोबलही उंचावले आहे आणि तिला कमकुवत दिसणाऱ्या जर्मनीविरुद्ध कोणतीही कसर सोडायची नाही आणि हा सामना अनिर्णित राहूनही ती पुढचा टप्पा गाठू शकेल. इ गटात स्पेन दोन सामन्यांनंतर चार गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्यापाठोपाठ जपान आणि कोस्टा रिका या दोघांचेही तीन गुण आहेत तर जर्मनीकडे फक्त एक गुण आहे. अशा परिस्थितीत गटातील चारही संघांना पुढील टप्प्यासाठी पात्र ठरण्याची संधी आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 18:36 IST

संबंधित बातम्या