क्रिस्टियानो रोनाल्डोच्या पोर्तुगालचा मंगळवारी रात्री (बुधवार IST) कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा विश्वचषकातील त्यांच्या राउंड ऑफ १६ च्या सामन्यात स्वित्झर्लंडशी सामना होता. पण सर्वांनाच आश्चर्य वाटले की, या सर्व-महत्त्वाच्या सामन्यासाठी, पोर्तुगालचे व्यवस्थापक फर्नांडो सँटोसने रोनाल्डोला बाहेर बेंचवर बसवले. ३७ वर्षीय खेळाडूची सुरुवातीच्या इलेव्हनमध्ये निवड झाली नाही आणि त्याच्या जागी गॅन्कालो रामोसला पहिल्यांदा संधी देण्यात आली. आणि २१ वर्षीय खेळाडूने लुसेल आयकॉनिक स्टेडियमवर स्विस संघावर ६-१ असा विजय मिळवून हॅट्ट्रिक साधली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२००८ नंतर प्रथमच कोणत्याही मोठ्या स्पर्धेत पोर्तुगालसाठी खेळ सुरू करणाऱ्या रोनाल्डोला अखेर सामन्याच्या ७३व्या मिनिटाला मैदानात उतरवण्यात आले, परंतु उर्वरित सामन्यात तो कोणताही महत्त्वपूर्ण प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला. त्याला एकदा नेटचा मागील भाग सापडला, परंतु बिल्डअपमध्ये ऑफसाइड कॉलमुळे तो प्रयत्न नाकारला गेला.

खेळानंतर रोनाल्डोची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्जने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तिने पोर्तुगालचे प्रशिक्षक फर्नांडो सॅंटोस यांची रोनाल्डोला बेंचवर बसविण्याच्या गोष्टीबाबत निंदा केली. ते म्हणतात की आम्हाला आमच्याच लोकांनी लुटले, बाहेरील लोकांची हिंमत कुठे होती. असाच काहीसा प्रकार ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या बाबतीत घडला, जेव्हा त्याला स्वित्झर्लंडविरुद्धच्या सामन्यात संघातून वगळण्यात आले होते.

हा सामना बाद फेरीचा होता, त्यामुळे रोनाल्डोचे येथे खेळण्याचे हे पहिले आणि सर्वात मोठे कारण होते. पण, याशिवाय आणखी एक कारण म्हणजे त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्ज ही मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होती. आता स्टेडियममध्ये गर्लफ्रेंड असणे आणि मॅच खेळायला न मिळणे हा रोनाल्डोसारख्या मोठ्या खेळाडूचा अपमान आहे. स्वित्झर्लंडविरुद्धच्या संपूर्ण सामन्यात रोनाल्डो खेळला नाही. तो बाकावर बसून राहिला.

हेही वाचा: David Warner: “क्रिकेटपेक्षा माझे कुटुंब माझ्यासाठी महत्त्वाचे…” डेव्हिड वॉर्नरने कर्णधारपदावरून क्रिकेट ऑस्ट्रेलियावर केली टीका

आता प्रश्न असा आहे की इतक्या महत्त्वाच्या सामन्यात रोनाल्डोला बेंचवर बसवण्याचा निर्णय कोणाचा होता? तर उत्तर आहे पोर्तुगालचे प्रशिक्षक फर्नांडो सँटोस, जे स्वतः रोनाल्डोला आपला मित्र म्हणतात. पोर्तुगीज प्रशिक्षक म्हणाले की, “या सामन्यात रोनाल्डोला न खेळवणे हा आमच्या रणनीतीचा भाग होता आणि शिस्तभंगाचा उपाय नाही.” तो पुढे म्हणाला, “आमच्या कर्णधाराची कोणतीही अडचण नाही. आम्ही दोघेही वर्षानुवर्षे चांगले मित्र आहोत. आम्ही सामन्यापूर्वी याबद्दल बोललो आणि त्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयात असे काहीही नाही.”

हेही वाचा: IND vs BAN 2nd ODI: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सिराजचे आक्रमक रुप, जाऊन भिडला नजमुल शांतोशी, video व्हायरल

अर्जेंटिनात जन्मलेल्या मॉडेलने पोस्टला कॅप्शन दिले, “अभिनंदन पोर्तुगाल. ११ खेळाडूंनी राष्ट्रगीत गायले तेव्हा सर्व गोल तुमच्यावर झाले. किती लाजिरवाणी गोष्ट आहे की तुझ्यासारख्या जगातील सर्वोत्तम खेळाडूला ९० मिनिटे खेळाचा आनंद लुटता आला नाही. मात्र तरीदेखील मैदानात तू चाहत्यांचे आश्रयस्थान होता. तुझ्यावर हक्क सांगणे आणि तुझ्या नावाच्या घोषणा देणे थांबले नाही. मला आशा आहे की देव तुझ्या प्रिय मित्राला सद्बुद्धि देवो .”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa wc 2022 kind of embarrassing ronaldos exclusion caused his girlfriend to lash out at the portugal manager avw
First published on: 07-12-2022 at 18:03 IST