फिफा विश्वचषक २०२२ चा आज १३वा दिवस आहे. आजही या स्पर्धेत चार सामने खेळवले जाणार आहेत. ग्रुप एफ आणि ग्रुप ई संघ आज आपले शेवटचे सामने खेळतील. पहिल्या गटात क्रोएशियाचा सामना बेल्जियमशी तर कॅनडाचा सामना मोरोक्कोशी झाला. अटीतटीच्या सामन्यात मोरोक्कोने कॅनडाला हरवत आणि त्याच गटातील दुसऱ्या सामन्यात माजी उपविश्वविजेत्यांनी बेल्जियमसोबत गोलशून्य बरोबरी साधत अंतिम-१६मध्ये स्थान पक्के केले.

गतविजेत्या क्रोएशियाने फुटबॉल विश्वचषकाच्या ग्रुप फ मध्ये बेल्जियमला ​​०-० असे बरोबरीत रोखले. या ड्रॉनंतर क्रोएशियाचा संघ उपउपांत्यपूर्व फेरीत पोहोचला. त्याने जगातील नंबर-२ संघ बेल्जियमला ​​बाहेर काढले. बेल्जियमने गेल्या वेळी विश्वचषकात तिसरे स्थान पटकावले होते. बेल्जियमच्या खेळाडूंनी ६०व्या मिनिटाला चांगली चाल रचली, पण संघाला गोल करता आला नाही. कॅरास्कोचा फटका क्रोएशियन गोलकीपरने रोखला, पण चेंडू त्याच्या पायाला लागून पुढे गेला. समोर उभ्या असलेल्या रोमेलू लुकाकूचा गोलपोस्ट रिकामा होता. त्याने शॉट मारला, पण चेंडू गोलपोस्टला लागून परत आला. अशाप्रकारे बेल्जियमचा संघ एकही गोल करू शकला नाही.

Anant Radhika's Pre-Wedding Ceremony Updates in Marathi
MS Dhoni : माही साक्षीसह अनंत राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी जामनगरला रवाना, VIDEO होतोय व्हायरल
Australia vs New Zealand 1st Match Updates in Marathi
NZ vs AUS : ग्रीन-हेझलवूडची शेवटच्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी, कॅमेरूनच्या शतकाने सावरला ऑस्ट्रेलियाचा डाव
team india kl rahul bcci
IND Vs ENG : केएल राहुल पाचव्या कसोटीलाही मुकणार, संघात दिग्गज खेळाडूचं पुनरागमन; अशी असेल टीम इंडिया
kl rahul still not fit likely to miss 5th Test against england in dharamsala
केएल राहुल अजूनही जायबंदीच;अखेरच्या कसोटी सामन्यातही खेळण्याची शक्यता कमीच

बेल्जियम आणि क्रोएशिया यांच्यात खेळाचा पूर्वार्ध सुरू झाला तेव्हा हाफटाइमला स्कोअर ०-० होता. दोन्ही संघांना तोपर्यंत एकही गोल करता आलेला नव्हता. क्रोएशियाने सहा आणि बेल्जियमने पाच गोल करण्याचे प्रयत्न केले, परंतु दोन्ही संघ लक्ष्यापासून दूर राहिले. १५व्या मिनिटाला क्रोएशियाला पेनल्टी मिळाली. बेल्जियमच्या कॅरास्कोने पेनल्टी बॉक्समध्ये क्रोएशियन स्ट्रायकर क्रेमेरिजला खाली पाडले. रेफ्रींनी क्रोएशियन संघाला पेनल्टी बहाल केली. लुका मॉड्रिच पेनल्टी घेण्यास तयार होता, पण व्हीएआरने निर्णय उलटवला. क्रोएशियाचा एक खेळाडू ऑफसाईड सापडला. त्यामुळे ते आघाडी घेण्यास मुकले.

मोरोक्कोचा २-१ कॅनडावर विजय

फुटबॉल विश्वचषकाच्या ग्रुप एफ मधील दुसऱ्या सामन्यात मोरोक्कोने कॅनडाचा २-१ असा पराभव केला. या विजयासह मोरक्कन संघाने बाद फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे. १९८६ नंतर तो प्रथमच उपउपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. मोरोक्कोला पुढे जाण्यासाठी या सामन्यात विजय किंवा ड्रॉ आवश्यक होता. तीन सामन्यांत सात गुणांसह ते गटात अव्वल स्थानावर आहेत. हकीम झिएच आणि युसेफ एन-नेसरी या स्टार खेळाडूंच्या गोलमुळे मोरोक्कोला उपउपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित करण्यात मदत झाली. त्याने हा सामना २-१ ने जिंकला. ते सहाव्यांदा फिफा विश्वचषकात खेळत आहे. याआधी त्यांना पाचपैकी एकदाच बाद फेरी गाठता आली होती.

कॅनडा आणि मोरोक्को यांच्यातील सामन्यात एक तासाचा खेळ पूर्ण झाला तेव्हा स्कोअर २-१ असा मोरोक्कोच्या बाजूने होता. कॅनडाच्या संघाने उत्तरार्धात पूर्वार्धापेक्षा चांगला खेळ दाखवला, पण संघाला गोल करता आला नाही. मोरोक्को आणि कॅनडा यांच्यातील रोमांचक सामन्यात खेळाचा पूर्वार्ध संपला तेव्हा मोरोक्को २-१ ने आघाडीवर होता. त्याच्याकडून हकीम झिएच आणि युसेफ अन-नेसरीने गोल केले. त्याचवेळी कॅनडाच्या संघाचा गोलही मोरोक्कनच्या खेळाडूने केला. नायफ अगुइर्डेने स्वत:चा गोल केला.