scorecardresearch

FIFA WC 2022: मेस्सी-एमबाप्पेला मोठी संधी! गेल्या ४४ वर्षात फक्त ‘हा’ खेळाडूच ६+ गोल करून ठरला होता गोल्डन बूटचा मानकरी

या ४४ वर्षांत रोनाल्डो वगळता कोणत्याही फुटबॉलपटूने सहापेक्षा जास्त गोल करून गोल्डन बूट जिंकलेला नाही. यावेळी एमबाप्पे, मेस्सी आणि गिरौड यांना हा विक्रम सुधारण्याची संधी आहे.

FIFA WC 2022: मेस्सी-एमबाप्पेला मोठी संधी! गेल्या ४४ वर्षात फक्त ‘हा’ खेळाडूच ६+ गोल करून ठरला होता गोल्डन बूटचा मानकरी
सौजन्य- फिफा विश्वचषक २०२२ (ट्विटर)

विश्वचषकात सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला प्रतिष्ठित गोल्डन बूट विजेतेपद मिळते. फ्रान्सचा किलीयन एमबाप्पे या विश्वचषकात आतापर्यंत पाच गोलांसह गोल्डन बूटचा सर्वात मोठा दावेदार आहे. अर्जेंटिनाचा दिग्गज लिओनेल मेस्सी आणि फ्रान्सचा अनुभवी स्ट्रायकर ऑलिव्हियर गिरौड हे प्रत्येकी चार गोल करण्यात त्याच्या केवळ एक पाऊल मागे आहेत, परंतु आतापर्यंतच्या ४४ वर्षात तब्बल ११ विश्वचषकांमध्ये फक्त एकदाच विश्वचषकात गोल्डन बूट विजेत्याने सहाहून अधिक गोल केले आहेत.

२० वर्षांपूर्वी ब्राझीलचा दिग्गज खेळाडू रोनाल्डोने २००२ च्या विश्वचषकात आठ गोल करून ही कामगिरी केली होती. हा अपवाद वगळता या ४४ वर्षात कोणत्याही फुटबॉलपटूने सहापेक्षा जास्त गोल करून गोल्डन बूट जिंकलेला नाही. यावेळी एमबाप्पे, मेस्सी आणि गिरौड यांना हा सहा गोलांचा विक्रम सुधारण्याची संधी आहे.

हेही वाचा: IND vs BAN 1st Test: श्रेयस अय्यरने रचला इतिहास! चेतेश्वर पुजाराचे शतक हुकले, भारताने पहिल्या दिवसअखेर केल्या २७८ धावा

फ्रान्सच्या फॉन्टेनने एकाच विश्वचषकात १३ गोलांसह सर्वाधिक गोल केले आहेत

रोनाल्डोच्या २००२ मध्ये केलेल्या आठ गोल नंतर, २००६ आणि २०१० च्या वर्ल्ड कपमध्ये फक्त पाच गोलांवर गोल्डन बूट देण्यात आला. विश्वचषकाच्या इतिहासात १६ गोलांसह सर्वाधिक गोल करणाऱ्या जर्मनीच्या मिरोस्लाव क्लोसने २००६ मध्ये तर जर्मनीच्या थॉमस म्युलरने २०१० च्या विश्वचषकात पाच गोलांसह गोल्डन बूट जिंकला होता. २०१४ मध्ये कोलंबियाच्या जेम्स रॉड्रिग्ज आणि २०१८ मध्ये इंग्लंडच्या हॅरी केनने प्रत्येकी सहा गोल करून गोल्डन बूट आपल्या नावावर केले होते.

रोनाल्डोच्या आधी १९७४ च्या विश्वचषकात पोलंडच्या ग्रेगॉर्ज लाटोने सर्वाधिक सात गोल करून गोल्डन बूट जिंकला होता. एकाच विश्वचषकात १३ गोलसह गोल्डन बूट जिंकण्याचा विक्रम फ्रान्सच्या जस्ट फॉन्टेनच्या नावावर आहे. १९५८ च्या विश्वचषकात त्याने ही कामगिरी केली होती. पश्चिम जर्मनीच्या जॉर्ड मुलरने १९७० च्या विश्वचषकात १० गोल केले होते. म्युलरने १९७४ मध्येही चार गोल केले होते.

हेही वाचा: ICC Rankings: काल आलेलं पोरगं विराट कोहलीला देतयं टशन, ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लॅबुशेनने केली विक्रमाशी बरोबरी

विजेत्या संघाच्या फुटबॉलपटूने ९२ वर्षांत केवळ तीन वेळा गोल्डन बूट जिंकला

फिफा विश्वचषक स्पर्धेच्या ९२ वर्षांच्या इतिहासात विजेत्या संघातील फुटबॉलपटूने गोल्डन बूट जिंकण्याची घटना केवळ तीनच वेळा घडली आहे. अर्जेंटिनाच्या मारियो केम्प्सने १९७८ च्या विश्वचषकात सहा गोल करून पहिल्यांदा ही कामगिरी केली होती. त्यानंतर १९८२ मध्ये इटलीच्या पाउलो रॉसीने सहा गोल केले आणि २००२ मध्ये ब्राझीलच्या रोनाल्डोने गोल्डन बूट जिंकला.

गेल्या ११ विश्वचषकात गोल्डन बूट जिंकणारे फुटबॉलपटू

फुटबॉलरदेशगोलविश्वचषक वर्ष
हॅरी केनइंग्लंड२०१८
जेम्स रॉड्रिग्जकोलंबिया२०१४
थॉमस मुलरजर्मनी२०१०
मिरोस्लाव क्लोजजर्मनी२००६
रोनाल्डो नाझारियोब्राझील२००२
डेवर सुकरक्रोएशिया१९९८
ओलेग सालेन्कोरशिया१९९४
साल्वाटोर शिलाचीइटली१९९०
गॅरी लिनकरइंग्लंड१९८६
पाउलो रॉसीइटली१९८२
मारियो कॅम्प्सअर्जेंटिना१९७८

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-12-2022 at 19:40 IST

संबंधित बातम्या