ब्राझील फुटबॉल संघाने फिफा विश्वचषकात आतापर्यंत सर्वोत्तम प्रदर्शन केले आहे. अंतिम१६च्या सामन्यात त्यांनी दक्षिण कोरियाला ४-१ ने पराभूत केल्यामुळे ते उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. मैदानावर दाखवलेल्या अचूकतेमुळे त्यांना आपले लक्ष्य सहज साधता आले. त्यानंतर सेलेकाओने त्यांच्या नृत्य कौशल्याचे केलेले प्रदर्शन आणि आपल्या देशाचा ध्वज फडकावत साजरा केलेला सोहळा हा अवर्णनीय होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्राझीलच्या खेळाडूंनी त्यांचे ट्रेडमार्क सांबा नृत्याच्या स्टेप्स करून प्रत्येक गोल साजरा केला. शानदार फॉर्ममध्ये असणारा आणि आतापर्यंत तीन गोल केले आहेत तो टॉटेनहॅम हॉटस्परचा फॉरवर्ड रिचर्लिसन आणि प्रशिक्षक टिटे यांनी ‘कबूतर नृत्य’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या नृत्याच्या स्टेप्स करून दक्षिण कोरियाविरुद्ध आपला गोल साजरा केला. लोकांना त्यांच्या उत्कृष्ट आणि सर्वोत्तम गोष्टींची आठवण करून देणारा ब्राझिलियन संघाचा स्थिर आणि शांत स्वभाव कतारमधील फिफा विश्वचषक स्पर्धेत हिट ठरला आहे. ब्राझीलची जर्सी घालून रिचार्लिसन सारख्या हुबेहूब ‘कबूतर डान्स’ करत असलेल्या एका लहान ब्राझिलियन मुलाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ईएसपीएनने गुरुवारी ही क्लिप पोस्ट केली आणि तिला ५.८९ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. “त्याचे कबूतर नृत्य खूप चांगले आहे,” असे त्यांनी क्लिपला कॅप्शन दिले. “ब्राझिलियन लोक हे खूपच वेगळ्या पद्धतीने जन्माला आले आहेत,” असे एका वापरकर्त्याने टिप्पणी केली. “तो २०३८ च्या विश्वचषकात ब्राझीलकडून खेळणार आहे,” असे दुसरा म्हणाला. तर तिसर्‍याने पोस्ट केले की, “ब्राझिलियन लोक नाचत आणि पायात चेंडू घेऊन जन्माला आले.”

आज ब्राझील भिडणार क्रोएशियाशी

आता क्रोएशियाला दक्षिण कोरियाविरुद्ध पूर्वार्धात चार गोल करणाऱ्या ब्राझील संघाची फॉरवर्ड लाईन सांभाळावी लागणार आहे. लुका मॉड्रिकच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या क्रोएशियाकडे डेजान लोव्हरेन, इव्हान पेरेसिक आणि मार्सेलो ब्रोझोविकसारखे खेळाडू आहेत. संघाचा खेळाडू डेलिच म्हणाला की, ब्राझील हा या विश्वचषकातील सर्वात मजबूत संघ आहे. त्यांच्या खेळाडूंची गुणवत्ता, कौशल्य आणि उपयुक्तता पाहता ते नक्कीच धोकादायक आहेत. आम्हाला अधिक आत्मविश्वासाने सामन्यात उतरावे लागेल आणि आम्हाला जे काही संधी मिळेल, त्याचा फायदा करून घ्यावा लागेल. ब्राझीलविरुद्ध खेळण्याचा आनंदही घ्यावा लागेल.

हेही वाचा: IND vs BAN: तिसऱ्या वनडेसाठी टीम इंडियाच्या ताफ्यात ‘चायनामन’ गोलंदाजाचा समावेश, केएल राहुलवर नेतृत्वाची जबाबदारी

गेल्या आठ विश्वचषकांमध्ये ब्राझीलचा संघ किमान उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचला आहे. या दरम्यान, ती १९९४ आणि २००२ मध्ये चॅम्पियन होती आणि १९९८ मध्ये उपविजेती ठरली. २०१४ मध्ये त्याच्या होस्टिंगमध्ये, ते उपांत्य फेरीत पोहोचले. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या चार सामन्यांमध्ये, क्रोएशियाने ९० मिनिटांत फक्त एकच सामना जिंकला आहे जेव्हा त्यांनी गट स्टेजमध्ये कॅनडाला ४-१ ने पराभूत केले होते. मोरोक्को आणि बेल्जियमविरुद्ध गोलशून्य ड्रॉ खेळले. नियमन वेळेनंतर १-१ अशा बरोबरीनंतर शूटआउटमध्ये जपानचा पराभव केला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa wc 2022 pigeon dance little brazilian boy imitates richarlisons dance on street video goes viral avw
First published on: 09-12-2022 at 14:45 IST