अर्जेटिनाविरुद्ध सर्वोत्तम खेळ करूनही इराणला पराभवाला सामोरे जावे लागले. सामन्याला कलाटणी देणारा सामनाधिकारी मिलोरॅड मॅझिक यांचा पेनल्टीचा निर्णय इराणविरुद्ध गेल्याने पराभव झाला, अशी टीका इराणच्या प्रसारमाध्यमांनी केली आहे. अर्जेटिना + एक सामनाधिकारी  = इराण ० अशा शब्दांत ‘जाम-ए-जाम’ वृत्तपत्राने मथळा दिला आहे.
सामनाधिकारी मिलोरॅड मॅझिक यांच्यामुळे अर्जेटिनाचा संघ जिंकला असे क्व्ॉड्स वृत्तपत्राने लिहिले आहे. इराणच्या सरकारी वृत्तपत्रानेदेखील इराणचा संघ अन्यायाचा बळी ठरल्याचे म्हटले आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष हस्सन रौहनी यांनी संघाच्या संघर्षपूर्ण खेळाचे कौतुक केले आहे.