रशियात २०१४मध्ये झालेल्या हिवाळी ऑलिम्पिकचे हे मुख्य स्टेडियम होते. या स्टेडियमवर हिवाळी ऑलिम्पिकचा उद्घाटन व समारोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. ऑलिम्पिकसाठीच हे स्टेडियम बांधण्यात आले होते. २००९मध्ये त्याच्या बांधकामास सुरुवात झाली व २०१३मध्ये त्याचे बांधकाम पूर्ण झाले. ऑलिम्पिक झाल्यानंतर विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी तेथील द्वितीय स्तरावरील गॅलरीचे काम करण्यात आले. एका बाजूला हिरवीगार फिश्तची पर्वतराजी व दुसऱ्या बाजूला सागरकिनारा यामध्ये हे स्टेडियम असल्यामुळे पर्यटनकेंद्र म्हणूनही त्याची ख्याती झाली आहे. या स्टेडियमला फिश्त स्टेडियम असेही म्हटले जाते. झेमेच्युझिना क्लबचे हे घरचे मैदान असून येथे आजपर्यंत अनेक सामने आयोजित करण्यात आले आहे.

  • आसन क्षमता : ४७ हजार ६५९
  • सामने : पोर्तुगाल वि. स्पेन, बेल्जियम वि. पनामा, जर्मनी वि. स्वीडन, ऑस्ट्रेलिया वि. पेरू, तसेच उपउपांत्यपूर्व फेरी व उपांत्यपूर्व फेरीतील प्रत्येकी एक सामना.