FIFA World Cup 2022: Coach Tite resigns after Brazil's crushing defeat, included in this list | Loksatta

FIFA World Cup 2022: ब्राझीलच्या पराभवानंतर संघात अस्वस्थता प्रशिक्षक टिटे यांनी घेतला मोठा निर्णय

उपांत्यपूर्व फेरीतील पराभवानंतर ब्राझीलच्या संघात सध्या खूप मोठे निराशाजनक वातावरण आहे. त्यातच प्रशिक्षक टिटे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे संघाला आणखी मोठा झटका बसला आहे.

FIFA World Cup 2022: ब्राझीलच्या पराभवानंतर संघात अस्वस्थता प्रशिक्षक टिटे यांनी घेतला मोठा निर्णय
संग्रहित छायाचित्र (इंडियन एक्सप्रेस)

उपउपांत्य फेरीतील पराभवानंतर ब्राझीलच्या संघात सध्या खूप मोठे निराशाजनक वातावरण आहे. त्यातच प्रशिक्षक टिटे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे संघाला आणखी मोठा झटका बसला आहे. शुक्रवारी रात्री क्रोएशियाकडून झालेल्या पराभवानंतर टिटे यांनी ब्राझील फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार होणार असल्याची पुष्टी केली आहे. स्पर्धेचा फेव्हरेट मानल्या जाणाऱ्या या संघाचा गतवर्षीच्या उपविजेत्या संघाकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव झाला. या पराभवासह ब्राझीलचा कतार विश्वचषक २०२२ चा प्रवास इथेच संपला आहे.

पाचवेळचा विश्वविजेता ब्राझीलच्या पराभवानंतर लगेचच टिटने ब्राझील बॉस म्हणून आपल्या भूमिकेचा राजीनामा दिला. ६१ वर्षीय टिटे यांनी जून २०१६ मध्ये पाच वेळा फिफा विश्वचषक विजेत्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्याच्या नेतृत्वाखाली ब्राझीलला ८१ सामन्यांत ६१ विजय, १३ अनिर्णित आणि सात पराभवांना सामोरे जावे लागले. टिटच्या संघाने २०१९ मध्ये कोपा अमेरिका जिंकली, परंतु सलग दोन फिफा विश्वचषकांच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यात अपयशी ठरले. ब्राझीलच्या स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर नेमार, मार्क्विनहोस आणि थियागो सिल्वा या दिग्गज खेळाडूंच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

हेही वाचा: क्रिकेटमुळे भारत-पाकिस्तान संबंध सुधारतील का? मोदींच्या मंत्रीमंडळातील परराष्ट्र मंत्री म्हणाले, “आपण जोपर्यंत…”

या निर्णयानंतर टिटे या विश्वचषकातील पराभवानंतर संघ सोडून गेलेल्या प्रशिक्षकांच्या यादीत सामील झाला आहे. या यादीमध्ये मोरोक्कोविरुद्ध पेनल्टीवर अंतिम १६ मध्ये बाद झाल्यानंतर स्पेनच्या व्यवस्थापकपदाचा राजीनामा देणारा लुईस एनरिक यांचा समावेश आहे. या यादीत बेल्जियमचा रॉबर्टो मार्टिनेझ, मेक्सिकोचा गेरार्डो मार्टिनो, घानाचा ओटो अडो आणि दक्षिण कोरियाचा पाउलो बेंटो यांचाही समावेश आहे.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, पहिल्या हाफच्या अतिरिक्त वेळेत नेमारने ब्राझीलला आघाडी मिळवून दिली होती, पण क्रोएशियाने ११७व्या मिनिटाला ब्रुनो पेटकोविचने केलेल्या गोलने सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये नेला. एज्युकेशन सिटी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात अधिकृत वेळेपर्यंत कोणत्याही संघाला गोल करता आला नाही, त्यानंतर सामना अतिरिक्त वेळेत गेला. नेमारने (१०५+१) अतिरिक्त वेळेचा पहिला गोल करून ब्राझीलला आघाडी मिळवून दिली, परंतु ब्रुनो पेटकोविकने ११७व्या मिनिटाला चेंडू नेटमध्ये टाकून क्रोएशियाला सामन्यात परत आणले.

हेही वाचा: Fifa World Cup 2022: मेस्सीने रचला इतिहास; पेनल्टी शूटआऊटमध्ये नेदरलँडचा पराभव करत अर्जेंटिना उपांत्य फेरीत

तत्पूर्वी, १०६ व्या मिनिटाला ब्राझीलच्या नेमारने जबरदस्त गोल करत १-० ने आघाडी घेतली. त्यामुळे हा सामना ब्राझीलचं जिंकेल, अशी आशा फुटबॉल चाहत्यांना होती. पण क्रोएशियाने ११६ व्या मिनिटाला गोल करत सामना बरोबरीत आणला. त्यानंतर हा सामना पेनेल्टी शूट आऊटमध्ये गेला. पेनेल्टी शूट आऊटमध्ये क्रोएशियाने बाजी मारत ब्राझीलला जोरदार धक्का दिला. पेनेल्टी शूट आऊटमध्ये ब्राझीलची पहिली कीक क्रोएशियाचा गोलरक्षक लिवाकोविचने अडवले. तर चौथी कीक गोलपोस्टला लागून बाहेर गेली. क्रोएशियाच्या खेळाडूंनी आपले चारही कीक अचूक मारले आणि संघाला उपांत्य फेरीत नेले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-12-2022 at 11:46 IST
Next Story
नेयमार मैदानात कधीच दिसणार नाही? FIFA World Cup मधून ब्राझील अनपेक्षितरित्या बाहेर पडल्यानंतर म्हणाला, “हा शेवट आहे असं…”