फिफा विश्वचषक २०२२ चा अंतिम सामना फ्रान्स आणि अर्जेंटिना संघांत खेळला जात आहे. अर्जेंटिना संघाचा कर्णधार लिओनेल मेस्सी आपला शेवटचा विश्वचषक खेळत आहे. त्यामुळे तो हा विश्वचषक जिंकण्यासाठी खूप प्रयत्न करताना दिसतोय. फिफा विश्वचषक विजेत्या संघाला चमकदार ट्रॉफी नक्कीच मिळेल. कारण त्याने पहिल्या २० मिनिटाच्या आत अर्जेंटिना संघासाठी पहिला गोल केला आहे. त्याचबरोबर त्याने एक विक्रम केला आहे.

एकाच विश्वचषकात प्रत्येक फेरीत गोल करणारा मेस्सी एकमेव खेळाडू ठरला आहे. ग्रुप स्टेज, सुपर १६, सुपर ८, सेमी फायनल आणि फायनल यासर्व फेरीत गोल करणारा लिओनेल मेस्सी हा एकमेव खेळाडू ठरला आहे. या गोलमुळे तो गोल्डन बूटच्या जवळ पोहचला आहे.

IPL 2024 Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: “निम्म्या खेळाडूंना तर इंग्लिशही समजत नाही…” RCB संघासह मॅनेजमेंटवरही भडकला वीरेंद्र सेहवाग
Shanshak Singh Performance in IPL 2024
IPL 2024 मध्ये ‘या’ खेळाडूने प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना फोडलाय घाम, ५ डावात फक्त एकदाच झालाय आऊट
IPL 2024 Rajasthan Royals vs Royal Challengers Banglore Match Updates in Marathi
IPL 2024: आधी चहलच्या गोलंदाजीवर लगावला षटकार अन् मग केली थोबाडीत मारण्याची अ‍ॅक्शन, VIDEO होतोय व्हायरल
md siraj
बंगळुरूच्या गोलंदाजांकडून कामगिरीत सुधारणेची अपेक्षा! ‘आयपीएल’मध्ये आज पंजाब किंग्जचे आव्हान

मेस्सीचा पेनल्टीवर पहिला गोल –

फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात २० मिनिटे झाली आणि डि मारियाच्या एका प्रयत्नाने पहिली पेनल्टी मिळाली आणि त्याचे रुपांतर स्टार खेळाडू मेस्सीने गोलमध्ये करत १-० अशी आघाडी मिळवून दिली. फ्रान्सचा कर्णधार आणि गोलरक्षक लॉरिसने मेस्सीची पेनल्टी चुकवली आणि या विश्वचषकात मेस्सीने सहावा गोल केला.

मारियाने अर्जेंटिनाला २-० अशी आघाडी मिळवून दिली –

३६व्या मिनिटाला डी मारियाने आपल्या अनुभवी खेळाचे शानदार प्रदर्शन करत सामन्यातील दुसरा गोल केला. यासह डी मारियाने अर्जेंटिनाला फ्रान्सविरुद्ध २-० अशी आघाडी मिळवून दिली. या गोलसाठी अ‍ॅलेक्सिस मॅकअलिस्टरने मदत केली. अ‍ॅलिस्टरच्या पासवर मारियाने शानदार गोल केला. त्याच्या शॉटला गोलरक्षक लॉरिसकडे उत्तर नव्हते.