दोहा : यजमान कतारला शुक्रवारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. अ-गटातील या सामन्यात आफ्रिकन चषक विजेत्या सेनेगलने कतारचा ३-१ असा पराभव केला. कतारला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील गोलखाते उघडण्यात यश आल्याचाच दिलासा मिळाला. सामन्याच्या सुरुवातीपासून दोन्ही संघातील खेळाडूंनी स्पर्धेतील पहिल्या विजयाच्या दृष्टिने प्रयत्न केले. कमालीच्या वेगाने चाली रचून एकमेकांच्या बचाव फळीवर दडपण आणण्याचे त्यांचे तंत्र होते. या नादात अनेकदा खेळाडूंकडून चुका झाल्याचे पाहायला मिळाले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पूर्वार्धात ४१व्या मिनिटाला सेनेगलने गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडली. बचाव फळीकडून झालेली चूक कतारला चांगलीच महागात पडली. चेंडूला पास देताना बचाव फळीचा अंदाज चुकला आणि याचा फायदा उठवत बुलाये डियाने सेनेगलचे खाते उघडले. त्यापूर्वी डियाला कतारच्या अफिफला धोकादायक पद्धतीने अडवण्याच्या नादात पिवळे कार्ड मिळाले होते. 

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa world cup 2022 hosts qatar suffer second straight defeat senegal winsysh
First published on: 26-11-2022 at 02:18 IST