फिफा विश्वचषक २०२२ मध्ये अर्जेंटिनाचा संघ विजयी मार्गावर परतला आहे. सौदी अरेबियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात या संघाला २-१ अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर अर्जेंटिनाला विश्वचषकात टिकून राहण्यासाठी आपला दुसरा सामना कोणत्याही किंमतीवर जिंकायचा होता आणि यावेळी मेस्सीने संघाला पुढे नेण्याची जबाबदारी घेतली. त्याने सामन्याच्या ६४व्या मिनिटाला गोल करत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर एन्झो फर्नांडिसनेही गोल करत अर्जेंटिनाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. अखेरीस, अर्जेंटिनाने मेक्सिकोला २-० ने पराभूत करून उपउपांत्यपूर्व फेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवल्या.

अर्जेंटिनासाठी ही फारशी संस्मरणीय कामगिरी नव्हती, पण स्पर्धेत टिकण्यासाठी हा सामना जिंकणे अत्यावश्यक होते. मेस्सीचा संघ दडपणाखाली विजयासह विजेतेपदाच्या शर्यतीत कायम आहे. अर्जेंटिना आणि मेक्सिको यांच्यातील सामन्यात पूर्वार्धात दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. यानंतर पुन्हा उलथापालथ होण्याची शक्यता होती, परंतु या सामन्याच्या ६४व्या मिनिटाला मेस्सीने एगिल डी मारियाकडून शानदार पास काढून संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर मेस्सीने युवा खेळाडू एन्झो फर्नांडिसला योग्य वेळी पास केले आणि युवा फर्नांडिसने ही संधी सोडली नाही. त्याने सामन्याच्या ८७व्या मिनिटाला गोल करून अर्जेंटिनाची आघाडी २-० अशी वाढवली, जी निर्णायक ठरली.

Rohit Sharma Unwanted Record In IPL 2024
MI vs CSK : रोहित शर्माच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद, ‘या’ बाबतीत ठरला तिसरा खेळाडू
Rr Vs Gt Ipl 2024 Sanju Samson 50th Match As Captain
RR vs GT : संजू सॅमसनने ५०व्या सामन्यात केला खास पराक्रम, ‘या’ बाबतीत रोहित शर्मासह तीन कर्णधारांना टाकले मागे
Who is Angkrish Raghuvanshi
IPL 2024 : कोण आहे अंगक्रिश रघुवंशी? ज्याने सुनील नरेनच्या साथीने दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची केली धुलाई
Mohit Sharma on Ravi Shastri's Comment
GT vs SRH : वयांवरुन खिल्ली उडवणाऱ्या रवी शास्त्रींना मोहित शर्माचे चोख प्रत्युत्तर; म्हणाला, ‘माझं वय वाढतंय…’

या सामन्यातील विजयासह अर्जेंटिनाचा संघ क गटात दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. हा संघ पोलंडच्या एका गुणाने मागे आहे. अर्जेंटिनाचा शेवटचा गट सामना पोलंडशी आहे आणि तो जिंकून मेस्सीच्या संघाला उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित करायचे आहे. त्याचबरोबर पुढील फेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी मेक्सिकोला सौदी अरेबियाचा पराभव करावा लागेल.

हेही वाचा :   FIFA World Cup 2022: पोलंडचा सौदी अरेबियावर विजय; लेवांडोवस्कीची चमक

सामन्याआधी लिओनेल मेस्सीला मेक्सिकोच्या चाहत्यांनी केली शिवीगाळ

वास्तविक, सौदी अरेबियाविरुद्धच्या पराभवाच्या एका दिवसानंतर दोहा येथील अल विद्दा पार्कमध्ये अर्जेंटिना आणि मेक्सिको संघाच्या चाहत्यांमध्ये गोंधळ झाला. ही घटना अल विड्डा पार्कच्या फॅन्स झोनमधील आहे. येथे मेक्सिको संघाचे चाहते एक व्हिडिओ बनवत होते, ज्यामध्ये ते मेस्सीला शिवीगाळ करत होते. हे ऐकल्यानंतर मेस्सीचे चाहते संतापले आणि प्रचंड गदारोळ झाला.

अर्जेंटिना आणि मेक्सिको संघाच्या चाहत्यांच्या दोन गटांमध्ये चुरशीची लढत झाली. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मोठी गोष्ट म्हणजे घटनेच्या वेळी आजूबाजूला एकही सुरक्षा रक्षक किंवा पोलीस नव्हता. अशा परिस्थितीत कतारच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आता अर्जेंटिना आणि मेक्सिको यांच्यातील सामना अत्यंत कडेकोट बंदोबस्तात होणार आहे.