Maria Rebelo becomes India's first woman to referee Germany vs Costa Rica men's football match in fifa world cup | Loksatta

FIFA World Cup 2022: सामन्यात रेफ्रीची भूमिका सांभाळणारी, मारिया रेबेलो ठरली भारताची पहिली महिला

फिफा विश्वचषक २०२२ स्पर्धेत जर्मनी विरुद्ध कोस्टा रिका या पुरुष फुटबॉल सामन्यांत, रेफ्रीची भूमिका सांभाळणारी मारिया रेबेलो भारताची पहिली महिला ठरली आहे.

FIFA World Cup 2022: सामन्यात रेफ्रीची भूमिका सांभाळणारी, मारिया रेबेलो ठरली भारताची पहिली महिला
जर्मनी विरुद्ध कोस्टा रिका या पुरुष फुटबॉल सामन्यांत, रेफ्रीची भूमिका सांभाळणारी मारिया रेबेलो भारताची पहिली महिला ठरली आहे.(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

कतारमधील फिफा विश्वचषक २०२२ स्पर्धा खेळली जात आहे. या स्पर्धेतील दुसरा जर्मनी विरुद्ध कोस्टा रिका यांच्यात खेळला गेला. जर्मनीने या सामन्यात कोस्टा रिका संघावर ४-२ अशा फरकाने मात केली. त्याचबरोबर स्टेफनी फ्रापार्ट आणि मारिया रेबेलोने या सामन्यात महिला रेफ्री म्हणून काम पाहिले. शिट्टी वाजवताच एक नवा पराक्रम केला आहे. यापैकी मारिया रेबेलो ही भारतीय आहे. मारिया, मूळची गोव्याची, पुरुषांच्या आय-लीग सामने आणि संतोष ट्रॉफीमध्ये अंपायरिंग करणारी पहिली महिला आहे.

मारिया रेबेलोने मातृभूमीशी संवाद साधताना सांगितले, “हा एक ऐतिहासिक क्षण आहे. जो आमच्यासारख्या लोकांना प्रेरणा देईल. मी देशातील जवळपास सर्वच पुरुषांच्या फुटबॉल स्पर्धांचा एक भाग आहे. नजीकच्या भविष्यात आणखी महिला या व्यवसायात उतरतील.”

मारिया २०१० पासून संतोष ट्रॉफी स्पर्धेच्या क्लस्टर सामन्यांचे रेफ्री म्हणून सक्रिय आहे. ती भारतीय महिला फुटबॉल संघाची माजी कर्णधारही आहे. तसेच, तिची आय-लीग २०१३-१४ च्या हंगामासाठी रेफ्रींच्या यादीत नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर मारिया २०११ पासून फिफा-सूचीबद्ध रेफ्री आहे. तसेच भारतात झालेल्या सतरा वर्षाखालील फिफा महिला विश्वचषकादरम्यान, मारियाला स्पर्धेसाठी रेफ्री मूल्यांकनकर्ता म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

गोव्यातील कर्टोरिम येथे जन्मलेल्या रेबेलोने लहान वयातच फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली होती. तसेच तिने २००१ मध्ये एएफसी महिला चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व देखील केले आहे. त्यानंतर तिने कारकिर्दीच्या सुरुवातीलाच खेळातून निवृत्ती घेतली आणि रेफ्रीमध्ये आपले नशीब आजमावले. तिने प्रथम गोव्याच्या स्थानिक लीगमधील पुरुषांच्या सामन्यांत रेफ्री म्हणून काम केले. त्यानंतर एसएएफएफ चॅम्पियनशिपमधील सामने रेफ्री म्हणून काम केले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 11:53 IST
Next Story
IPL 2023 Auction: आयपीएलचे बिगुल वाजले; ‘या’ दिवशी होणार ९९१ पैकी ८७ खेळाडूंचा लिलाव, पाहा संपूर्ण यादी