Poland team led by Robert Lewandowski defeated Saudi Arabia. Lewandowski has expressed his feelings after Poland's first win | Loksatta

FIFA World Cup 2022: “माझ्या बालपणीचे स्वप्न…” रॉबर्ट लेवांडोस्कीने पोलंडच्या विजयानंतर व्यक्त केल्या भावना

फिफा विश्वचषक २०२२ मध्ये, रॉबर्ट लेवांडोस्कीच्या नेतृत्वाखाली पोलंड संघाने सौदी अरेबियाचा पराभव केला. पोलंडच्या पहिल्या विजयानंतर लेवांडोस्कीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

FIFA World Cup 2022: “माझ्या बालपणीचे स्वप्न…” रॉबर्ट लेवांडोस्कीने पोलंडच्या विजयानंतर व्यक्त केल्या भावना
सौजन्य- फिफा विश्वचषक २०२२ (ट्विटर)

कतारचे यजमानपद असलेल्या फिफा विश्वचषक २०२२ मध्ये पोलंड आणि सौदी अरेबिया यांच्यात एक रोमांचक सामना खेळला गेला. या सामन्यात रॉबर्ट लेवांडोस्कीच्या नेतृत्वाखाली पोलंड संघाने २-० असा दणदणीत विजय नोंदवला. पोलंडसाठी जिएलिन्स्कीने पहिला गोल केला. हा गोल पहिल्या हाफच्या ३९व्या मिनिटालाच झाला. याआधी पोलंडने मेक्सिकोविरुद्धच्या सामन्यात ०-० अशा बरोबरीत सामना सोडवला होता. त्यामुळे या विजयाने बाद फेरीत जाण्याच्या आशा अधिक बळकट झाल्या आहेत.

रॉबर्ट लेवांडोव्स्कीने शनिवारी चालू असलेल्या फिफा विश्वचषकाच्या स्पर्धेतील सामन्यात गोल केल्यानंतर अखेर त्याचे बालपणीचे स्वप्न पूर्ण झाल्याचे सांगितले. एज्युकेशन सिटी स्टेडियमवर सुरू असलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेतील क गटातील लढतीत पिओटर झीलिन्स्की आणि रॉबर्ट लेवांडोव्स्की यांनी केलेले गोल आणि वोजिएच स्झेस्नीने पेनल्टी सेव्ह केल्याने पोलंडने सौदी अरेबियाविरुद्ध २-० असा विजय मिळवला.

बार्सिलोनाच्या या फॉरवर्डने पाचव्या सामन्यात विश्वचषकातील पहिला गोल नोंदवला आणि सौदी अरेबियाविरुद्ध ८२ मिनिटांत पोलंडचा दुसरा गोल नोंदवत आणखी फायदा करून घेतला. गोल डॉट कॉमने सामन्यानंतर रॉबर्ट लेवांडोस्कीची मुलाखत घेतली. त्यात तो म्हणाला की, “मला याची जाणीव आहे की कदाचित हा माझा शेवटचा विश्वचषक असेल. राष्ट्रगीत सुरू असताना आणि ते गाताना मला माझ्या मनातील भावना जाणवल्या. मला केवळ विश्वचषकात सहभागी झाल्याबद्दलच नव्हे तर तिथे गोल केल्याबद्दलही चाहत्यांच्या स्मरणात राहायचे होते. तसेच. मी विश्वचषकात नेहमी गोल करण्यासाठी खूप संघर्ष केला आणि आज अखेर ते मी यशस्वी केले.”

हेही वाचा :   FIFA World Cup 2022: मेस्सी आणि फर्नांडिसच्या जादुई गोलमुळे अर्जेंटिनाच्या बाद फेरीतील आशा कायम

रॉबर्ट लेवांडोव्स्की पुढे बोलताना म्हणाला, ” सामन्यादरम्यान आम्ही गोल केल्यानंतर, माझ्या मनात असलेली प्रत्येक गोष्ट, पाहिलेली स्वप्ने, मी केलेला गोल आणि त्याचे महत्त्व अधोरेखित झाले. या गोलनंतर माझ्या लहानपणापासूनची ती सर्व स्वप्ने पूर्ण झाली जी खूप महत्त्वाची होती,” तो म्हणाला. अर्जेंटिनाविरुद्धच्या प्रसिद्ध विजयानंतर, सौदी अरेबियाने आक्रमक सुरुवात केली होती. मात्र पोलंडने योग्य वेळी गोल करत सामन्यावरची पकड घट्ट केली आणि विजय मिळवला.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 10:24 IST
Next Story
IND vs NZ 2nd ODI: सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमधून वगळल्याने सोशल मीडियावर चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी, पाहा