Brazil will go against Switzerland without Neymar, Ronaldo will be seen against Uruguay | Loksatta

FIFA World Cup 2022: पोर्तुगाल आणि ब्राझीलकडे आजचा सामना जिंकून राउंड १६ पोहचण्याची संधी

ब्राझीलचा स्टार खेळाडू नेमारला पहिल्या सामन्यात दुखापत झाल्याने तो स्वित्झर्लंडविरुद्ध खेळणार नाही. त्याचवेळी पोर्तुगालच्या संघाला उरुग्वेवर मात करून उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित करायचे आहे.

Brazil will go against Switzerland without Neymar, Ronaldo will be seen against Uruguay
सौजन्य- लोकसत्ता ग्राफिक्स

फिफा विश्वचषक २०२२ चा आज नववा दिवस आहे. आजही चार सामने होणार आहेत. यातील दोन गट जी आणि दोन गट एच मधील असतील. ब्राझील आणि पोर्तुगालसारखे मोठे संघ आज मैदानात उतरणार आहेत. दिवसाचा पहिला सामना कॅमेरून आणि सर्बिया यांच्यात आहे. यानंतर घानाचा सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे. तिसऱ्या सामन्यात ब्राझीलचा सामना स्वित्झर्लंडशी होणार आहे. मात्र, ब्राझीलचा स्टार खेळाडू नेमार हा सामना खेळणार नाही. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात त्याला दुखापत झाली होती. आजचा शेवटचा सामना पोर्तुगाल आणि उरुग्वे यांच्यात होणार आहे. या सामन्यात क्रिस्टियानो रोनाल्डोची कामगिरी होणार आहे.

कॅमेरून संघ पहिल्यांदाच सर्बियाशी भिडणार आहे

दिवसाचा पहिला सामना जी गटातील कॅमेरून आणि सर्बिया यांच्यात आहे. दोन्ही संघ प्रथमच एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. अल झैनाब स्टेडियमवर होणार्‍या या सामन्यात दोन्ही संघांना विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवायच्या आहेत. दोन्ही संघांनी पहिला सामना गमावला आहे. सर्बियाला ब्राझीलविरुद्ध तर कॅमेरूनला स्वित्झर्लंडविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात पराभूत होणारा संघ उपउपांत्यपूर्व फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल.

हेही वाचा :   Riots in Brussels: मोरोक्कोविरुद्धच्या पराभवानंतर बेल्जियममध्ये उसळला हिंसाचार, अनेकांना घेतले ताब्यात

दक्षिण कोरियाला विजयाची गती कायम ठेवायची आहे

आजच्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण कोरियाचा सामना घानाशी होणार आहे. दक्षिण कोरियाच्या संघाला हा सामना आपल्या नावावर करून विजयाची गती कायम ठेवायची आहे. या संघाचा शेवटचा सामना उरुग्वेविरुद्ध अनिर्णित राहिला होता. दक्षिण कोरियाने गेल्या पाचपैकी तीन सामने जिंकले आहेत, तर दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. त्याचबरोबर घानाच्या संघाने गेल्या पाचपैकी तीन लढती जिंकल्या आहेत, मात्र दोन सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. शेवटच्या सामन्यात ब्राझीलने घानाचा पराभव केला. आता घाना संघाला या विश्वचषकात पहिला विजय नोंदवायचा आहे.

 ब्राझीलला सोमवारी येथे फिफा विश्वचषक स्पर्धेत जी गटातील लढतीत स्वित्झर्लंडच्या कडव्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. विश्वचषकात ब्राझील आणि स्वित्झर्लंड दोनदा आमनेसामने आले आहेत. दोन्ही सामने अनिर्णित राहिले आहेत. ब्राझीलचा संघ आपला स्टार फॉरवर्ड नेमारशिवाय या सामन्यात प्रवेश करेल, जो दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर पडला आहे. स्वित्झर्लंड गेल्या १८ महिन्यांत चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि या काळात अनेक मोठ्या संघांना पराभूत केले आहे. यंदाच्या नेशन्स लीगमध्ये स्वित्झर्लंडने पोर्तुगाल आणि स्पेनचा पराभव केला आहे.

हेही वाचा :  FIFA World Cup 2022: स्पेनसोबतचा सामना बरोबरीत सुटल्याने चारवेळा चॅम्पियन असलेल्या जर्मनी समोरील अडचणीत वाढ

उरुग्वेविरुद्धच्या विजयासह पोर्तुगाल बाद फेरीत पोहोचेल

सुपरस्टार फॉरवर्ड क्रिस्टियानो रोनाल्डोचा संघ पोर्तुगाल सोमवारी एच गटात विश्वचषकात उरुग्वेशी भिडणार आहे. उरुग्वेला पराभूत करण्यात पोर्तुगाल यशस्वी ठरल्यास राउंड १६ मध्ये पोहोचणे निश्चित होईल. पोर्तुगाल तीन गुणांसह गटात अव्वल तर उरुग्वे एका गुणासह दुसऱ्या स्थानावर आहे. उरुग्वे आणि पोर्तुगाल २०१८च्या रशियातील विश्वचषकात शेवटचे भिडले होते, ज्यामध्ये उरुग्वेने २-१ ने सामना जिंकला, काव्हानीने दोन गोल केले. उरुग्वेचा स्टार खेळाडू लुईस सुआरेझला दक्षिण कोरियाविरुद्ध एकही गोल करता आला नाही, त्यामुळे संघाने गोलशून्य बरोबरी साधली. पोर्तुगालच्या संघाला एकदाही विश्वचषक ट्रॉफी मिळवता आलेली नाही, तर उरुग्वेने दोनदा हे विजेतेपद पटकावले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 13:18 IST
Next Story
सानिया मिर्झा-शोएब मलिकचा घटस्फोट निश्चित, फक्त ‘या’ कारणामुळे अधिकृत घोषणा बाकी