FIFA World Cup Preview: Will Ronaldo's decades-long wait end, how powerful is Portugal against Ghana | Loksatta

FIFA World Cup 2022: घानाविरुद्धच्या सामन्यात रोनाल्डो करणार विश्वविक्रम, गोल करताच इतिहास रचणार

सर्वांच्या नजरा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोवर असतील, घानाविरुद्ध पोर्तुगाल या विश्वचषकात सुरुवात करणार असून कदाचित रोनाल्डोचा हा शेवटचा विश्वचषक असेल.

FIFA World Cup 2022: घानाविरुद्धच्या सामन्यात रोनाल्डो करणार विश्वविक्रम, गोल करताच इतिहास रचणार
सौजन्य- (ट्विटर)

गुरुवारी फिफा विश्वचषकात घानाविरुद्ध मैदानात उतरल्यावर सर्वांच्या नजरा पोर्तुगालचा कर्णधार आणि सुपरस्टार फॉरवर्ड क्रिस्टियानो रोनाल्डोवर असतील. रोनाल्डोने घानाविरुद्ध गोल केल्यास पाच वेगवेगळ्या विश्वचषकांमध्ये गोल करणारा तो पहिला खेळाडू ठरेल. तो कतारमध्ये प्रशिक्षण घेत आहे, परंतु मंगळवारी त्याने परस्पर संमतीने मँचेस्टर युनायटेड सोडले. ३७ वर्षीय रोनाल्डो आपला पाचवा आणि कदाचित शेवटचा विश्वचषक खेळत आहे आणि यावेळी संघ घानाविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करत आहे. मँचेस्टर युनायटेडसोबत सुरू असलेल्या वादाचा संघाच्या विश्वचषक मोहिमेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे रोनाल्डोने म्हटले होते.

या सामन्यातील विजेतेपदासाठी पोर्तुगालचा संघ प्रबळ दावेदार मानला जात आहे. प्रशिक्षक फर्नांडो सँटोसच्या पोर्तुगीज संघात आक्रमण आणि मिडफिल्डमध्ये खूप ताकदवान आहे आणि २०१६ मध्ये युरोपियन चॅम्पियनशिपचे विजेतेपद त्यांनी जिंकले होते. रोनाल्डोने परस्पर संमतीने युनायटेडशी वेगळे होण्यापूर्वी सांगितले होते की पोर्तुगालच्या विश्वचषक मोहिमेदरम्यान त्याच्या क्लबशी संबंधित समस्यांचा त्याच्यावर परिणाम होणार नाही. रोनाल्डोला अद्याप विश्वचषक जिंकता आलेला नाही आणि प्रथमच ट्रॉफी मिळवणे हे या विश्वचषकातील त्याचे प्रेरणास्थान असेल. तसेच नवीन क्लबला आकर्षित करणे हा त्यांच्यासाठी बोनस असेल.

हेही वाचा :   FIFA World Cup 2022: पेलेनंतर हा स्पॅनिश फुटबॉलपटू ठरला विश्वचषकात गोल करणारा सर्वात तरुण खेळाडू

दुसरीकडे, घानाच्या संघाला त्यांचा अनुभवी खेळाडू सादियो मानेची उणीव भासणार आहे, जो दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. पण रोनाल्डोचे खेळाडू घानाला हलके घेऊ इच्छित नाहीत कारण हा संघ मोठा अपसेट करण्यात माहिर आहे. सौदी अरेबियानेही मंगळवारी अर्जेंटिनाचा पराभव करून या स्पर्धेत काहीही शक्य आहे हे दाखवून दिले. मिडफिल्डर जॉर्डन आय्यूच्या चांगल्या कामगिरीवर घानाचा विश्वास असेल.

हेही वाचा :   झिम्बाब्वे दौऱ्यावर शेवटच्या क्षणी कर्णधारपदावरून हटवल्याचे गुपित उघड, शिखर धवनच्या वक्तव्याने खळबळ

घानाकडून पोर्तुगाल आतापर्यंत कधीही पराभूत झाला नाही

पोर्तुगाल आणि घाना यांच्यात आतापर्यंत दोन सामने झाले आहेत. यातील एक सामना पोर्तुगालने जिंकला, तर दुसरा सामना अनिर्णित राहिला. अशा परिस्थितीत घाना संघाला रोनाल्डोच्या संघाचा पराभव करून विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने करायची आहे. त्याचबरोबर विजयी सुरुवात करताना पोर्तुगाल संघाला ही स्पर्धा जिंकायची आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोचा हा शेवटचा विश्वचषक आहे. अशा स्थितीत त्याचा संघ त्याला विजयासह अलविदा म्हणू इच्छितो.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-11-2022 at 13:33 IST
Next Story
झिम्बाब्वे दौऱ्यावर शेवटच्या क्षणी कर्णधारपदावरून हटवल्याचे गुपित उघड, शिखर धवनच्या वक्तव्याने खळबळ