scorecardresearch

fifa world cup 2022 : कुलिबालीच्या गोलमुळे इक्वेडोरवर मात

सामन्याच्या सुरुवातीपासूनच सेनेगलने आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्धी इक्वेडोरवर दडपण निर्माण केले.

fifa world cup 2022 : कुलिबालीच्या गोलमुळे इक्वेडोरवर मात
सेनेगलचे खेळाडू विजयाचा आनंद साजरा करताना (AP Photo/Francisco Seco)

दोहा : इस्माइला सार आणि कर्णधार कालिदू कुलिबाली यांनी केलेल्या गोलच्या बळावर सेनेगलने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अ-गटातील अखेरच्या सामन्यात इक्वेडोर संघावर २-१ असा विजय मिळवत उपउपांत्यपूर्व फेरीतील आपली जागा निश्चित केली.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच सेनेगलने आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्धी इक्वेडोरवर दडपण निर्माण केले. इक्वेडोरच्या बचाव फळीच्या चुकीमुळे सेनेगलला पेनल्टी बहाल करण्यात आली. या पेनल्टीवर ४४व्या मिनिटाला सारने गोल करत सेनेगलला १-० अशी आघाडी मिळवून दिली.

दुसऱ्या सत्रात इक्वेडोरकडून बरोबरी साधण्याचे प्रयत्न सुरू झाले. ६७व्या मिनिटाला  फेलिक्स टोरेसच्या साहाय्याने मोइसेस कैसेडोने सेनेगलच्या गोलरक्षक एडवार्ड मेंडीला चकवत गोल केला आणि सामना

१-१ असा बरोबरीत आणला. ही बरोबरी इक्वेडोरला फार काळ टिकवता आली नाही. ७०व्या मिनिटाला कुलिबालीने अप्रतिम गोल करत सेनेगलला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 05:44 IST

संबंधित बातम्या