22-year-old Colombian midfielder Andres Balanta passed away | Loksatta

FIFA World Cup 2022:  धक्कादायक! फिफा विश्वचषकात ट्रेनिंग दरम्यान २२ वर्षीय फुटबॉलपटूचा मृत्यू

फिफा विश्वचषकादरम्यान एक दुःखद बातमी समोर आली आहे. कोलंबियाच्या एका २२ वर्षीय फुटबॉलपटूचा प्रशिक्षणादरम्यान मृत्यू झाला.

FIFA World Cup 2022:  धक्कादायक! फिफा विश्वचषकात ट्रेनिंग दरम्यान २२ वर्षीय फुटबॉलपटूचा मृत्यू
संग्रहित छायाचित्र (इंडियन एक्सप्रेस)

सध्या कतारमध्ये फुटबॉल जगतातील सर्वात मोठा फिफा विश्वचषकादरम्यान एक दुःखद बातमी समोर आली आहे. कोलंबियाच्या एका २२ वर्षीय फुटबॉलपटूचा प्रशिक्षणादरम्यान मृत्यू झाला. अर्जेंटिना फर्स्ट डिव्हिजन क्लब ऍटलेटिको टुकुमनच्या प्रशिक्षणादरम्यान कोलंबियाचा मिडफिल्डर आंद्रेस बालांटा याचा मंगळवारी कोसळून मृत्यू झाला. त्याला तुकुमन आरोग्य केंद्र रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याचा मृत्यू झाला. २२ वर्षीय बालांटावर डॉक्टरांनी ताबडतोब उपचार केले, ज्यांनी त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही.

डिफेन्सिव्ह मिडफिल्डर जुलै २०२१ मध्ये डेपोर्टिव्हो कॅली येथून ऍटलेटिकोमध्ये सामील झाला आणि २०१९ अंडर-२० विश्वचषक स्पर्धेत कोलंबिया राष्ट्रीय संघाकडून खेळला होता. त्याच्या मृत्यूनंतर क्लबने त्याच्या कुटुंबीयांना माहिती दिली. क्लब व्यवस्थापनाने पत्रकार परिषदेत सांगितले की, “आम्ही सर्व काही तयार केले आहे, जेणेकरून त्याचा मृतदेह लवकरात लवकर त्याच्या (प्रांतात) देशात घेऊन जाता शकेल.”

क्लॅरिन या वृत्तपत्राने माहिती दिली आहे की २०१९ मध्ये बालांटाला अशीच समस्या आली होती, ज्यासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तो प्रशिक्षणात कोलमडला आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. “कमी ग्लुकोजमुळे त्याला चयापचय-प्रकारचे सिंकोप (किरकोळ मूर्च्छा) ग्रस्त झाले होते, तरीही एमआरआय आणि इलेक्ट्रोकार्डियोग्राममध्ये काहीही असामान्य दिसून आले नाही,” क्लॅरिन वृतानुसार ही माहिती समोर येत आहे.

हेही वाचा :   BCCI CAC: बीसीसीआयने क्रिकेट सल्लागार समितीसाठी तीन सदस्यांची केली निवड, टीम इंडियाच्या या माजी खेळाडूंना स्थान

कतारमध्ये सुरु असलेल्या फिफा विश्वचषकादरम्यान आलेल्या या दुखःद बातमीमुळे संपूर्ण फुटबॉल जगत शोक व्यक्त करत आहेत. कारण २२ वर्षाच्या वयात एखाद्या तरुण खेळाडूचा मृत्यू होणं ही खूपच दुर्दैवी घटना आहे. काही खेळाडू त्या काळात आपल्या करिअरची सुरुवात करतात, तो ऐन उमेदीचा काळ असतो. कतारमधील वैद्यकीय अहवालानुसार त्याला दम्याचा आजार असावा पण अति सराव केल्याने देखील अशी परिस्थीती उद्भवत असते अशी देखील माहिती समोर आली आहे. त्यांनी या खेळाडूला वाचवण्याचा निकराने प्रयत्न केला मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सेन्ट्रोल-दी-सालूद रुग्णालयात घेऊन जाईस तोपर्यंत अर्ध्यावाटेत त्याचा मृत्यू झाला होता. त्या क्लबचा हा दुसरा सामन्याआधीचे सराव शिबीर होते.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 17:50 IST
Next Story
PAK vs ENG Test: कर्णधार बाबर ‘या’ खेळाडूला मानतो आपला आदर्श; त्याच्याप्रमाणे शॉट्स खेळण्याचा करतो प्रयत्न