केरळ हे फुटबॉलच्या क्रेझसाठी ओळखले जाते. परंतु ही क्रेझ असलेल्या फुटबॉलच्या चाहत्यांसाठी एक अडचण निर्माण झाली आहे. कारण केरळमधील एका मुस्लिम संघटनेनं शुक्रवारी राज्यातील फुटबॉल-वेड्या तरुणांवर आक्षेप घेतला आहे. “चाहत्यांनी सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात सहभागी होणाऱ्या त्यांच्या संघांच्या समर्थनार्थ स्टार खेळाडूंचे कटआऊट लावणे, फुटबॉलच्या कटआउट्सची पूजा करणे हे इस्लामविरोधी आहे. तसेच अनेक देशांची वाताहत करणाऱ्या पोर्तुगालचा त्यांनी झेंडा फडकवू नये”, असे या संघटनेनं सांगितले आहे.

समस्थ केरळ जाम-इय्याथुल उलामाशी संबंधित कुतुबा समितीचे सरचिटणीस नसर फैझी कूदाथयी यांनी फुटबॉल चाहत्यांनी अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी, पोर्तुगालचा क्रिस्टियानो रोनाल्डो आणि ब्राझीलचा नेमार जूनियर यांच्या कटआउटवर मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च केल्याबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, “कतारमधील खेळांमुळे विद्यार्थ्यांची अभ्यासातील आवड कमी होत आहे”.

BJP Politics in Tamil Nadu blending caste and faith
तमिळनाडूमध्ये जात व धर्माची मोट बांधण्याचा भाजपाचा प्रयत्न! काय आहे परिस्थिती?
Muslim League, Hindu Mahasabha, coalition government, pre independence alliance
मुस्लीम लीग आणि हिंदू महासभेने मिळून स्थापली होती प्रांतिक सरकारे… स्वातंत्र्यपूर्व काळातील आघाडीबद्दल इतिहास काय सांगतो?
National Conference (NC) Party president Farooq Abdullah and Peoples Democratic Party (PDP) leader Mehbooba Mufti
इंडिया आघाडीत आणखी एक गोंधळ; महबूबा मुफ्ती यांच्याविरुद्ध नॅशनल कॉन्फरन्सने दिला उमेदवार
vladimir putin
“इस्लामिक कट्टरतावाद्यांकडून मॉस्कोत दहशतवादी हल्ला”, पुतिन यांचं वक्तव्य; युक्रेनचा उल्लेख करत म्हणाले…

मौलवी नसर फैझी कूदाथयी म्हणाले, “अनेक देशांची वाताहत करणाऱ्या पोर्तुगालचा ध्वज फडकवणे योग्य नाही. तसेच खेळाडूच्या दृष्टीकोनातून खेळाकडे पाहिले पाहिजे. फुटबॉल हा ताप बनत चालला आहे, ज्याचे लोकांना व्यसन होत आहे. हे चांगले नाही.” त्यांच्या मते, “शारीरिक हालचालींना प्रोत्साहन देणारा खेळ म्हणूनच खेळाचा प्रचार व्हायला हवा”. ते पुढे म्हणाले, “त्याऐवजी, चाहते क्रीडा-तारकांची पूजा करण्यात मग्न आहेत. आज हे लोक इतर देशांच्या झेंड्यांचा आदर करत आहेत आणि इतर देशांचे झेंडे फडकवत आहेत”.

कूदाथयी पुढे म्हणाले, “आपल्या देशावर प्रेम करण्याऐवजी, काहीजण फुटबॉल स्टार्सची पूजा करण्यात गुंतले आहेत. इस्लाममध्ये लोक कशाची पूजा करू शकतात याला मर्यादा आहेत. तसेच, लोक पोर्तुगीजचे झेंडे फडकावत आहेत. हा अनेक देशांची वाताहत करणारा देश आहे.”

इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा अधिकार कोणालाही नाही

दरम्यान, राज्याचे शिक्षण मंत्री व्ही शिवनकुट्टी म्हणाले, “फॅन असणं आणि फुटबॉलच्या दिग्गजांची पूजा करणं हा प्रत्येकाच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा भाग आहे. त्यामुळे इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा अधिकार कोणालाही नाही. एखादी व्यक्ती मॅच पाहायची की नाही, संगीत ऐकायचं की नाही, पुस्तक वाचायचं की नाही हे ठरवू शकते. ही ज्याची त्याची निवड आहे. आपल्या संविधानाने आपल्याला सर्व स्वातंत्र्य दिले आहे. त्यावर कोणीही बंधने घालू शकत नाही.”

हेही वाचा – FIFA World Cup 2022: वेन हेनेसी वर्ल्ड कप इतिहासात रेड कार्ड मिळवणारा ठरला तिसरा गोलरक्षक, पाहा अगोदर कोणाला मिळाले

इंडियन युनियन मुस्लिम लीगचे नेते एमके मुनीर म्हणाले, “जनजागृती करण्याचा संस्थेचा हेतू असेल तर ती करू शकते. पण, ते स्वीकारायचे की नाही हे ठरवण्याचा अधिकारही लोकांना आहे. फुटबॉल हा असा खेळ आहे ज्याचा आनंद केवळ विद्यार्थीच नाही तर वडीलधारी मंडळीही घेतात”. राज्यातील फुटबॉलवेड्या चाहत्यांबद्दल मुस्लिम धर्माच्या दृष्टिकोनाबद्दल विचारले असता, मुनीर पत्रकारांना म्हणाले, “केवळ विद्यार्थीच नाही तर प्रौढ देखील उत्साहाने फुटबॉल पाहतात आणि त्याचे अनुसरण करतात. मला वाटते की तुम्ही त्यांना विचारले पाहिजे.”