कतारमध्ये खेळल्या जाणाऱ्या फिफा विश्वचषक २०२२ मध्ये गट-स्टेज सामने संपले आहेत. गट-टप्पा संपल्यानंतर, १६ संघांनी उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, तर उर्वरित १६ संघांना आपले सामान गुंडळावे लागले आहे. प्री-क्वार्टर फायनलसाठी पात्र ठरलेला फ्रान्स हा पहिला संघ ठरला. त्यानंतर ब्राझील, पोर्तुगाल आणि अर्जेंटिना या संघांनीही फ्रान्सच्या पावलावर पाऊल टाकत सुपर-१६ फेरीत स्थान मिळवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्री-क्वार्टर फायनलमध्ये पोहोचलेल्या १६ संघांमध्ये फ्रान्स, ब्राझील, पोर्तुगाल, नेदरलँड, सेनेगल, यूएसए, इंग्लंड, अर्जेंटिना, पोलंड, स्वित्झर्लंड, क्रोएशिया, जपान, मोरोक्को, स्पेन, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश आहे. त्याचबरोबर चार वेळचा चॅम्पियन जर्मनी आणि वर्ल्ड नंबर २ बेल्जियम या संघांना सुपर-१६ मध्ये स्थान मिळवता आले नाही.

प्री-क्वार्टर फायनल फेरीचे वेळापत्रक (भारतीय वेळ) –

३ डिसेंबर नेदरलँड वि यूएसए (रात्री ८.३०)
४ डिसेंबर अर्जेंटिना विरुद्ध ऑस्ट्रेलिया, (रात्री १२.३०)
४ डिसेंबर फ्रान्स विरुद्ध पोलंड, (रात्री ८.३०)
५ डिसेंबर इंग्लंड विरुद्ध सेनेगल, (रात्री १२.३०)
५ डिसेंबर जपान विरुद्ध क्रोएशिया, (रात्री ८.३०)
६डिसेंबर ब्राझील विरुद्ध दक्षिण कोरिया, (रात्री १२.३०)
६ डिसेंबर मोरोक्को विरुद्ध स्पेन, (रात्री ८.३०)
७ डिसेंबर पोर्तुगाल विरुद्ध स्वित्झर्लंड, (रात्री १२.३०)

आशियातील तीन संघ बाद फेरीत –

स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच आशियाई (AFC) मधील तीन संघांनी उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. या तीन संघांमध्ये जपान, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलियाच्या नावांचा समावेश आहे. अमेरिकेनेही आश्चर्यकारकरीत्या बाद फेरीत प्रवेश केला आहे. सौदी अरेबियाने त्यांच्या पहिल्या सामन्यात लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाला पराभूत करताना विश्वचषकातील गट टप्प्यातील सर्वात मोठा अपसेट खेचला. असे असूनही सलग दोन सामने हरल्याने सौदी अरेबियाला पुढील फेरी गाठता आली नाही.

हेही वाचा – FIFA World Cup 2022: ब्राझीलला हरवून कॅमेरूनने रचला इतिहास, तर स्वित्झर्लंड प्री-क्वार्टर फायनलमध्ये दाखल

मेस्सी-रोनाल्डोची टक्कर अंतिम फेरीतच शक्य होणार –

या विश्वचषकात ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी आमनेसामने येणार की नाही याची चाहत्यांना उत्सुकता असेल. समीकरणांवर नजर टाकली तर अंतिम फेरीत अर्जेंटिना आणि पोर्तुगाल यांच्यात सामना होऊ शकतो. रोनाल्डोच्या संघाने प्री-क्वार्टर फायनलमध्ये स्वित्झर्लंडचा पराभव केल्यास अंतिम आठमध्ये स्पेन आणि मोरोक्को यांच्यातील सामन्यातील विजेत्याशी सामना होईल. दुसरीकडे, मेस्सीचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकला, तर प्री-क्वार्टर फेरीत त्याचा सामना नेदरलँड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विजेत्याशी होईल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa world cup 2022 thrill of super16 matches from today see schedule of all matches vbm
First published on: 03-12-2022 at 12:04 IST