scorecardresearch

FIFA World Cup 2022: पोर्तुगालसमोर स्विर्त्झंलडचे आव्हान

पोर्तुगाल ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व सामन्यात स्विर्त्झंलडविरुद्ध उतरेल तेव्हा संघाचा प्रयत्न पुढील फेरीत जागा निश्चित करण्याचा असेल.

FIFA World Cup 2022: पोर्तुगालसमोर स्विर्त्झंलडचे आव्हान

दोहा : पोर्तुगाल ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व सामन्यात स्विर्त्झंलडविरुद्ध उतरेल तेव्हा संघाचा प्रयत्न पुढील फेरीत जागा निश्चित करण्याचा असेल. यासह तारांकित आघाडीपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. रोनाल्डोला आतापर्यंत साजेशी कामगिरी करता आलेली नाही. रोनाल्डोने स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात गोल करत पाच विश्वचषक स्पर्धेत गोल करणारा पहिला खेळाडू बनला. विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत त्याने आठ गोल केले आहेत. मात्र, यामधील एकही गोल बाद फेरीत आलेला नाही. यामुळे रोनाल्डोचा प्रयत्न सर्वोत्तम कामगिरीचा असेल.

दुसरीकडे, स्विर्त्झंलड १९५४ नंतर प्रथम उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. मात्र, पोर्तुगालसाठी त्यांचे आव्हान सोपे नसेल. स्विर्त्झंलडने गेल्या वर्षी युरोपियन अजिंक्यपद स्पर्धेत फ्रान्सला उपउपांत्यपूर्व फेरीत नमवले होते. स्विर्त्झंलडने गेल्या काही काळात आपल्या कामगिरीत सातत्य राखले आहे.  पोर्तुगालने आपल्या साखळी सामन्यातील सुरुवातीचे दोन सामने जिंकत आगेकूच केली होती. मात्र, अखेरच्या साखळी सामन्यात त्यांना दक्षिण कोरियाने नमवले होते. स्विर्त्झंलडची मदार ब्रील एंबोलोवर असेल. त्याने साखळी फेरीत संघासाठी दोन गोल केले होते. गेल्या पाच सामन्यांत या खेळाडूच्या नावे चार गोल आहेत.

  • वेळ : मध्यरात्री १२.३० वा.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 00:53 IST

संबंधित बातम्या