दोहा : विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील ह-गटात शुक्रवारी झालेल्या सामन्यात आशियाई देश दक्षिण कोरियाने पोर्तुगालचा २-१ असा पराभव केला. या गटातील अन्य सामन्यात उरुग्वेने घानाला २-० असे पराभूत केले. मात्र, तीन साखळी सामन्यांत मिळून उरुग्वेपेक्षा अधिक गोल केल्याने कोरियाने बाद फेरीत प्रवेश केला. पोर्तुगालने गटात अव्वल स्थान मिळवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यापूर्वीच बाद फेरीत प्रवेश केलेल्या पोर्तुगालने सामन्याच्या पाचव्या मिनिटाला गोल करुन वेगवान सुरुवात केली. हा गोल रिकाडरे होर्टाने केला. त्यानंतर पोर्तुगालने चेंडूवर नियंत्रण राखले, पण त्यांना गोलच्या संधी निर्माण करता आल्या नाहीत. कोरियाच्या सॉन ह्युंग मिनच्या वेगाचा सामना करण्यातही पोर्तुगालचा संघ अपयशी ठरला. २७व्या मिनिटाला योंग ग्वान किमने कोरियाला बरोबरी साधून दिली. मग ९० मिनिटांनंतरच्या भरपाई वेळेतील वांग ही-चॅनने केलेल्या प्रेक्षणीय गोलने कोरियाचा विजय आणि बाद फेरीतील प्रवेश निश्चित केला. पोर्तुगालचा कॉर्नर फसल्यानंतर सोंगने चेंडूचा ताबा मिळवून पोर्तुगालच्या कक्षात मुसंडी मारली. त्याच वेळी सोंगच्या मागोमाग तेवढय़ाच वेगाने चॅनने मैदानाचे अंतर पार करत पोर्तुगालच्या गोलकक्षात प्रवेश केला आणि सोंगच्या पासला अचूक जाळीची दिशा देत कोरियाचा विजयी गोल केला.

More Stories onफिफाFIFA
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa world cup 2022 uruguay beat ghana korea in knockout round zws
First published on: 03-12-2022 at 06:11 IST