scorecardresearch

Fifa World Cup 2022: बचावाच्या बळावर मोरोक्को फ्रान्सला रोखणार का? दुसऱ्या उपांत्य फेरीत कोण अधिक मजबूत, घ्या जाणून

गतविजेत्या फ्रान्सचे सलग दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीकडे लक्ष लागले आहे. मोरोक्को जिंकला तर अंतिम फेरीत खेळणारा तो पहिला आफ्रिकन संघ ठरणार आहे.

Fifa World Cup 2022: बचावाच्या बळावर मोरोक्को फ्रान्सला रोखणार का? दुसऱ्या उपांत्य फेरीत कोण अधिक मजबूत, घ्या जाणून
मोरोक्को आणि फ्रान्सचे संघ (फोटो-ट्विटर)

कतारचे यजमानपद असलेल्या फिफा विश्वचषक २०२२ मध्ये आज (१४ डिसेंबर) दुसरा उपांत्य फेरीचा सामना खेळवला जाईल. या सामन्यात गतवेळचा चॅम्पियन फ्रान्स मोरोक्कोशी भिडणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार उशिरा रात्री १२:३० पासून अल बायत स्टेडियमवर खेळवला जाईल.

या विश्वचषकात गतविजेत्या फ्रान्सची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याचा आक्रमक खेळ. फॉरवर्ड किलियन एम्बाप्पे, ऑलिव्हियर गिरौड आणि अँटोइन ग्रिजमन हे यात सर्वात मोठे बलस्थान बनले आहेत. पण आता या तिघांचीही कसोटी मोरोक्कोविरुद्ध होणार आहे. तसे, फिफा जागतिक क्रमवारीत फ्रान्सचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे, तर मोरोक्को २२व्या क्रमांकावर आहे.

मोरोक्कोने स्पेन-पोर्तुगाल-बेल्जियमचा पराभव केला –

याचे कारण म्हणजे मोरोक्कन संघाची मजबूत बचाव फळी आहे. या विश्वचषकात आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ५ सामन्यांपैकी एकही मोरोक्कोने गमावलेला नाही. हे याचं उदाहरणावरून समजू शकतं. तसेच एकच गोल खाल्ला आहे. हा गोलही मोरोक्कनच्या खेळाडूने कॅनडाविरुद्धच्या गोलपोस्टमध्ये केला होता. म्हणजेच समोरच्या कोणत्याही संघाला मोरोक्कोविरुद्ध आतापर्यंत गोल करता आलेला नाही.

या स्पर्धेत मोरोक्कोने उपउपांत्यपूर्व फेरीत स्पेनचा तर उपांत्यपूर्व फेरीत ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या संघ पोर्तुगालचा पराभव केला. तर ग्रुप स्टेजमध्ये जगातील नंबर-२ संघ बेल्जियमचाही पराभव केला. अशा स्थितीत मोरोक्कोला आता उपांत्य फेरीत आपल्या भक्कम बचावाच्या जोरावर फ्रान्सचा पराभव करून मोठ्या अपसेटचे वेध लागले आहेत.

फ्रान्सची नजर सलग दुसऱ्या फायनलवर –

दुसरीकडे, एम्बाप्पेने या मोसमात आतापर्यंत ५ गोल केले आहेत. गोल्डन बूटच्या शर्यतीत त्याची लिओनेल मेस्सीशी बरोबरी आहे. पण मोरोक्कोविरुद्धच्या त्याच्या आक्रमक खेळाचीही कठोर परीक्षा होणार आहे. फ्रान्सने हा सामना जिंकल्यास सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली जाईल. गेल्या वेळी त्यानी क्रोएशियाला हरवून विजेतेपद पटकावले होते. तर यंदा मोरोक्को उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला आफ्रिकन संघ ठरला आहे.

हेही वाचा – FIFA WC 2022: मेस्सी-एमबाप्पेला मोठी संधी! गेल्या ४४ वर्षात फक्त ‘हा’ खेळाडूच ६+ गोल करून ठरला होता गोल्डन बूटचा मानकरी

या विश्वचषकात फ्रान्सने आतापर्यंत एकूण ११ गोल केले आहेत, तर मोरोक्कन संघ केवळ ५ गोल करू शकला आहे. गोलच्या प्रयत्नात लक्ष्यावर मारलेले शॉट बघितले तर त्यातही फ्रान्स पुढे आहे. त्याने लक्ष्यावर (शॉट ऑन टारगेट) ३० शॉट्स मारले आहेत, तर मोरोक्कोला १३ वेळा असे करता आले आहे.

फ्रान्सचे मोरोक्कोवर वर्चस्व –

हेड-टू-हेड रेकॉर्ड पाहिल्यास मोरोक्कोविरुद्ध फ्रान्सचा वरचष्मा आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ११ सामने झाले आहेत. ज्यामध्ये फ्रान्सने ७ आणि मोरोक्कोने एक सामना जिंकला आहे. ३ सामने अनिर्णित राहिले आहेत. मात्र, या विश्वचषकाबद्दल बोलायचे झाले, तर फ्रान्सने एक सामना हरला आहे. ग्रुप स्टेजमध्ये त्याचा ट्युनिशियाकडून पराभव झाला होता. तर मोरोक्कोने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही.

दोन्ही संघांची संभाव्य सुरुवातीची इलेव्हन –

फ्रान्सः ह्यूगो लॉरिस, ज्युल्स कोंडे, राफेल वराने, डेओट उपमाकानो, लुकास हर्नांडेझ, ऑरेलियन चौमेनी, अॅड्रिएन रॅबिओट, ओस्माने डेम्बेले, अँटोइन ग्रिजमन, काइलियन एमबाप्पे आणि ऑलिव्हियर गिरौड.

हेही वाचा – Fifa World Cup 2022: शेवटचा विश्वचषक खेळत असलेल्या मेस्सीच्या संघाचा विजय निश्चित? ‘हे’ दोन आश्चर्यकारक योगायोग देत आहेत साक्ष

मोरोक्को: यासीन बोनो, अश्रफ हकीमी, जावेद एल यामिक, नायेफ एगेर्ड, नासेर मजरावी, अझेदिन ओनाही, सोफियान अमराबत, सलीम अमल्लाह, हकीम झियेश, युसेफ एन-नेसिरी आणि सोफियान बौफल.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-12-2022 at 22:25 IST

संबंधित बातम्या