Lionel Messi Viral Video: फिफा वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन या दोन्ही संघांमध्ये पार पडला. दोन्ही संघांमध्ये अटीतटीचा सामना पार पडला. ९० मिनिटांत दोन्ही संघातील खेळाडूंना एकही गोल करता आला नव्हता. त्यानंतर सामना एक्स्ट्रा टाईममध्ये गेला. शेवटी सामन्यातील १०६ व्या मिनिटाला फेरान टॉरेसने दमदार गोल केला आणि स्पेनला आघाडी मिळवून दिली. या एकमेव गोलच्या बळावर स्पेनने अर्जेंटिनावर १-० ने विजय मिळवला. यासह स्पेनने १६ वर्षांनंतर वर्ल्डकप विजयाची ट्रॉफी उंचावली. दरम्यान सामन्यानंतर अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीच्या निवृत्तीच्या चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.
अर्जेंटिनाला हा सामना जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. या संघाने आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये दमदार विजय मिळवले होते. त्यामुळे अंतिम सामन्यातही अर्जेंटिनाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मेस्सी या स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानी होता. त्यामुळे तो या सामन्यातही गोल करुन अर्जेंटिनाला लागोपाठ दुसरं जेतेपद मिळवून देणार, असं म्हटलं जात होतं. पण या सामन्यात त्याला एकही गोल करता आला नाही. दरम्यान सामना झाल्यानंतर मेस्सीला अश्रू अनावर झाले. मेस्सीचे डोळे पाणावले होते. तो चाहत्यांचे आभार मानताना दिसून आला. यावरुन मेस्सीने निवृत्ती जाहीर केली आहे की काय, अशी चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. हा त्याचा फिफा वर्ल्डकप स्पर्धेतील शेवटचा सामना होता, हे तर नक्की आहे. कारण पुढचा वर्ल्डकप हा २०३० मध्ये होणार आहे. तोपर्यंत मेस्सी आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळण्याची शक्यता खूप कमी आहे.
मेस्सीची सामन्याआधीची पोस्ट चर्चेत
स्पेनविरुद्धच्या अंतिम सामन्याआधी मेस्सीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टनंतरही मेस्सी निवृत्त होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्याने अर्जेंटिना संघाचा आणि कोचिंग स्टफचा ग्रुप फोटो शेअर केला होता. या पोस्टवर कॅप्शन देत त्याने लिहिले होते की, “इतके वर्ष खेळताना, सर्वात महत्वाची गोष्ट ही राहिली की, हे फक्त वर्ल्डकप जिंकण्यापूर्ती मर्यादीत नव्हतं. तर हा संपूर्ण प्रवास महत्वाचा होता. या ग्रूपसोबत प्रत्येक दिवस घालवणं, एकमेकांशी स्पर्धा करणं आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेणं. माझ्या संघातील प्रत्येक सहकाऱ्याचे, कोचिंग स्टाफचे आणि राष्ट्रीय संघाला दररोज एका कुटुंबासारखं एकत्र बांधून ठेवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या त्या सर्व लोकांचे मनापासून आभार.”
स्पेनचा ऐतिहासिक विजय
या सामन्यात दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. सामन्यातील १०६ व्या मिनिटाला पहिला गोल झाला. हा गोल फेरान टॉरेसने केला. यासह स्पेनने २०१० नंतर दुसऱ्यांदा जेतेपदाचा मान पटकावला. याआधी २०१० मध्ये झालेल्या फिफा वर्ल्डकप फायनलमध्ये अर्जेंटिनाने नेदरलँड्सला १-० ने पराभूत करुन पहिल्यांदा जेतेपदाची ट्रॉफी उंचावली होती. फेरान टॉरेस या सामन्याचा हिरो ठरला.
