Fight In FIFA World Cup Final, Argentina vs Spain: फिफा वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील फायनलचा सामना अर्जेंटिना आणि स्पेन या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये पार पडला. हा सामना न्यूयॉर्कच्या न्यूजर्सी स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यात लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वात खेळत असलेल्या अर्जेंटिनाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. पण,स्पेनने अर्जेंटिनाला पराभवाचा धक्का दिला. हा सामना स्पेनने १-० च्या फरकाने जिंकून १६ वर्षांनंतर दुसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरलं. दरम्यान या विजयानंतर या सामन्यानंतर अर्जेंटिना आणि स्पेन संघातील खेळाडूंमध्ये जोरदार वाद झाला. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

फायनल संपताच, स्पेनच्या खेळाडूंनी विजयाचा जल्लोष करायला सुरुवात केली. पण त्यानंतर काही सेकंदातच खेळाडूंमध्ये वाद सुरु झाला. लिएंड्रो परेडेस स्पेनच्या खेळाडूंकडे गेला आणि धक्काबुक्की करु लागला. त्याने स्पेनचा खेळाडू गार्सियाला लाथ मारली, त्यामुळे तो खाली पडला. पण त्यानंतर जेव्हा तो उभा राहिला, त्यावेळी परेडेसने त्याचा गळा पकडला. त्यानंतर दोन्ही संघातील खेळाडूंनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. ज्यात गावीचा समावेश होता. पण त्यानंतर परेडेसेने गार्सियाला बाजूला केलं आणि मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या गावीवर हल्ला चढवला. त्याने गावीलाही खाली पाडलं. या वादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या वादानंतर रेफ्रीने लिएंड्रो परेडेसला रेड कार्ड दिलं. त्यामुळे त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. फिफाकडून या प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. जर या प्रकरणात परेडेसची चूक आढळून आली, तर त्याच्यावर फिफाकडून कारवाई केली जाऊ शकते. नेमकं काय घडलं आणि हा वाद नेमका कशावरुन झाला? हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. सामना सुरु असताना, स्पेनचा मिडफिल्डर अँजो फर्नांडेजला देखील रेड कार्ड देण्यात आलं होतं. त्यामुळे अर्जेंटिनाला १० खेळाडूंसह सामना खेळावा लागला.

स्पेनचा ऐतिहासिक विजय

या सामन्यात स्पेनने अर्जेंटिनावर ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. २०१० मध्ये स्पेनने नेदरलँड्सला १-० ने पराभूत करुन पहिल्यांदा जेतेपदाचा मान मिळवला होता. त्यानंतर दुसरा विजय मिळवण्यासाठी स्पेनला १६ वर्षे वाट पाहावी लागली आहे. अखेर अर्जेंटिनासारख्या बलाढ्य संघावर १-० ने विजय मिळवून स्पेनने १६ वर्षांनंतर ऐतिहासिक विजयाची नोंद केली.