Norway Viking Row Celebration Controversy: फिफा वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत नॉर्वेचा दमदार फॉर्म पाहायला मिळाला आहे. नॉर्वेचा संघ या स्पर्धेत आपल्या दमदार कामगिरीसह आपल्या सेलिब्रेशनमुळेही तुफान चर्चेत आहे. सामन्यानंतर खेळाडूंनी केलेलं ‘वाइकिंग’ सेलिब्रेशन ही त्यांची नवी ओळख बनली आहे. सेनेगलविरूद्ध झालेल्या सामन्यात नॉर्वेने ३-२ ने दमदार विजयाची नोंद केली होती. या विजयानंतर खेळाडू आणि सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांनी मिळून वाइकिंग सेलिब्रेशन केलं होतं. या सेलिब्रेशनमध्ये खेळाडू , सपोर्ट स्टाफमधील सदस्य आणि चाहते एकत्र मिळून नाव चालवण्याची एक्टिंग करतात. पण आता या सेलिब्रेशनमुळे वादाला तोंड फुटलं आहे. काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या.

नॉर्वेच्या या सेलिब्रेशनची जगभरात चर्चा रंगली आहे. अनेकांना हे सेलिब्रेशन आकर्षक आणि काहीतरी वेगळं वाटलं. पण नॉर्वेच्या शेजारील देशांना हे सेलिब्रेशन आवडलेलं नाही. स्वीडनचा डिफेंडर गु्स्ताफ लागरबिएल्केला हा ट्रेंड मुळीच आवडलेला नाही. तर काही खेळाडूंनी या सेलिब्रेशनची तुलना आइसलँडच्या प्रसिद्ध थंडरक्लॅप सेलिब्रेशनसोबत केली आहे. हे सेलिब्रेशन सुरुवातीला नवीन होतं. पण, आता पुन्हा तेच तेच पाहायला मिळत असल्याची प्रतिक्रिया अनेक खेळाडूंनी दिली आहे.

वाइकिंग ट्रेंडची जगभर चर्चा सुरु असली तरीदेखील स्वीडनला हा ट्रेंड इतका खास वाटलेला नाही. तर दुसरीकडे डेन्मार्कने नॉर्वेच्या यशावर अस्वस्थता व्यक्त केल्याचे दिसून आले आहे. डेन्मार्कचा संघ वर्ल्डकप स्पर्धेसाठी पात्र ठरु शकलेला नाही. त्यामुळे नॉर्वेने मिळवलेलं यश हे डेन्मार्कच्या चाहत्यांना पाहवत नसल्याचं दिसून येत आहे. नॉर्वेची फिफा वर्ल्डकप स्पर्धेतील कामगिरी हा डेन्मार्कमध्ये सध्या चर्चेचा विषय आहे. नॉर्वेचा संघ सध्या त्यांच्या फुटबॉल इतिहासातील आतापर्यंतच्या दमदार फॉर्ममध्ये आहे.

नॉर्वेच्या खेळाडूंनी केलेलं वाइकिंग सेलिब्रेशन हे आता फक्त सेलिब्रेशनपूर्ती मर्यादीत राहिलेलं नाही, ही त्यांची नवी ओळख बनली आहे. पण हेच सेलिब्रेशन नॉर्वेच्या शेजारील देशांमध्ये वादाचं कारण बनलं आहे. नॉर्वेने दमदार कामगिरी करुन विजय मिळवल्यानंतर हे सेलिब्रेशन केलं होतं. त्यामुळे नॉर्वेसाठी हे सेलिब्रेशन आत्मविश्वास आणि यशाचे प्रतीक आहे. पण इतर देशांसाठी हे सेलिब्रेशन म्हणजे गरजेपेक्षा जास्त प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं जात आहे. इथून पुढेही नॉर्वेचा संघ हे सेलिब्रेशन करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.