Spain football team wins record prize money in FIFA World Cup: फिफा विश्वचषक २०२६ चा विजेता ठरला स्पेनचा संघ. गतविजेत्या अर्जेंटिनास संघाचा १-० असा पराभव करत संघाने१६ वर्षांनी जेतेपदावर आपलं नाव कोरलं. तर अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी डोळ्यांत अश्रू घेऊन मैदानाबाहेर पडला. फुटबॉलमधील सर्वात प्रतिष्ठेची ट्रॉफी जिंकण्याबरोबरच स्पेनच्या संघावर कोट्यवधी डॉलरच्या बक्षिसांचा पाऊस पडला आहे. तर अर्जेंटिना संघाला किती बक्षीस मिळालं जाणून घ्या.

स्पेनच्या विजयाचा शिल्पकार ठरला फेरान टोरेस. त्याने अतिरिक्त वेळेत केलेला एकमेव गोल सामन्याचा निर्णायक क्षण ठरला. यंदाच्या विश्वचषकातील त्याचा हा पहिलाच गोल असला, तरी तो त्याच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा गोल ठरला. या गोलच्या जोरावर स्पेनने अर्जेंटिनाचं विश्वविजेतेपद हिरावून घेत पुन्हा एकदा फुटबॉल विश्वावर आपलं वर्चस्व सिद्ध केलं.

फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या विजेत्या संघाला किती बक्षिस मिळालं?

फिफा परिषदेने (FIFA Council) गेल्या वर्षी फिफा विश्वचषक २०२६ साठी विक्रमी ७२७ दशलक्ष अमेरिकी डॉलर म्हणजेच अंदाजे ६,२१६ कोटी इतक्या आर्थिक निधीला मंजुरी दिली होती. त्यापैकी ६५५ दशलक्ष अमेरिकी डॉलर (म्हणजेच ५,६०० कोटी) ही रक्कम स्पर्धेत सहभागी झालेल्या ४८ संघांमध्ये बक्षिसाच्या स्वरूपात वाटप करण्यात आली. विशेष म्हणजे, २०२२ च्या विश्वचषकाच्या तुलनेत यंदाच्या स्पर्धेतील बक्षिसाच्या रकमेतील तब्बल ५० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

फिफा विश्वचषक २०२६ विजेत्या स्पेन संघाला तब्बल ५१ दशलक्ष डॉलर (सुमारे ४४० कोटी रुपये) इतकी बक्षिसाची रक्कम देण्यात आली आहे. विश्वचषकाच्या इतिहासातील विजेत्या संघासाठीची ही आतापर्यंतची सर्वात मोठी पुरस्काराची रक्कम आहे. तर उपविजेत्या अर्जेंटिना संघाला ३४ दशलक्ष डॉलर (सुमारे २९१ कोटी रुपये) इतकी रक्कम देण्यात आली आहे.

FIFA WC 2026 बक्षिसाच्या रकमेचं वितरण पुढीलप्रमाणे

विजेता – स्पेन – ५० दशलक्ष अमेरिकी डॉलर (सुमारे ४२८ कोटी)
उपविजेता – अर्जेंटिना – ३३ दशलक्ष अमेरिकी डॉलर (सुमारे २८२ कोटी)
तिसरे स्थान – इंग्लंड – २९ दशलक्ष अमेरिकी डॉलर (सुमारे २४८ कोटी)
चौथे स्थान – फ्रान्स – २७ दशलक्ष अमेरिकी डॉलर (सुमारे २३१ कोटी)

इतर संघांसाठी बक्षिसाची रक्कम

५वे ते ८वे स्थान – १९ दशलक्ष अमेरिकी डॉलर (सुमारे १६२ कोटी)
९वे ते १६वे स्थान – १५ दशलक्ष अमेरिकी डॉलर (सुमारे १२८ कोटी)
१७वे ते ३२वे स्थान – ११ दशलक्ष अमेरिकी डॉलर (सुमारे ९४ कोटी)
३३वे ते ४८वे स्थान – ९ दशलक्ष अमेरिकी डॉलर (सुमारे ७७ कोटी)