FIFA World Cup 2026 Round of-16 Schedule: फिफा विश्वचषक २०२६ चा रोमांच दिवसागणिक वाढत चालला आहे. राऊंड ऑफ ३२ मधील बाद फेरीचे सामने संपल्यानंतर, ‘राऊंड ऑफ १६’ फेरीचं चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झालं आहे. या स्पर्धेची सुरुवात ४८ संघांसह झाली होती आणि त्यापैकी ३२ संघ आता स्पर्धेतून बाहेर झाले आहेत. एकूण १६ अव्वल दर्जाच्या संघांनी या रोमांचक टप्प्यावर पुढील फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे; या टप्प्यावर झालेला एकही पराभव विजेतेपदाचं स्वप्न धुळीस मिळवू शकतो. पाहूया कसं आहे राऊंड ऑफ-१६चं वेळापत्रक.
राऊंड ऑफ-१६ साठी कोणते संघ पात्र ठरले आहेत?
२०२६ फिफा विश्वचषकाच्या ‘राउंड ऑफ १६’ फेरीमध्ये पोहोचलेल्या संघांमध्ये कॅनडा, मोरोक्को, पॅराग्वे, फ्रान्स, ब्राझील, नॉर्वे, मेक्सिको, इंग्लंड, अमेरिका, स्पेन, पोर्तुगाल, बेल्जियम, स्वित्झर्लंड, इजिप्त, कोलंबिया आणि अर्जेंटिना यांचा समावेश आहे. आता या १६ संघांपैकी ८ संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी (क्वार्टर-फायनल्स) पात्र ठरतील; याचा अर्थ असा की, या फेरीनंतर आणखी ८ संघ स्पर्धेतून बाहेर पडतील.
सुपर-१६ मधील संघ कधी आणि कोणाविरुद्ध खेळतील?
कॅनडा विरुद्ध मोरोक्को: ४ जुलै, ह्युस्टन स्टेडियम, रात्री १०:३० वाजता
पराग्वे विरुद्ध फ्रान्स: ५ जुलै, फिलाडेल्फिया स्टेडियम, पहाटे २:३० वाजता
ब्राझील विरुद्ध नॉर्वे: ६ जुलै, न्यू जर्सी स्टेडियम, पहाटे १:३० वाजता
मेक्सिको विरुद्ध इंग्लंड: ६ जुलै, मेक्सिको सिटी स्टेडियम, पहाटे ५:३० वाजता
पोर्तुगाल विरुद्ध स्पेन: ७ जुलै, डॅलस स्टेडियम, पहाटे १२:३० वाजता
अमेरिका विरुद्ध बेल्जियम: ७ जुलै, सिएटल स्टेडियम, पहाटे ५:३० वाजता
अर्जेंटिना विरुद्ध इजिप्त: ७ जुलै, अटलांटा स्टेडियम, रात्री ९:३० वाजता
स्वित्झर्लंड विरुद्ध कोलंबिया: ८ जुलै, बीसी प्लेस व्हँकुव्हर, पहाटे १:३० वाजता
राऊंड ऑफ-१६ मधील रोमांचक लढती कोणत्या असतील?
राऊंड ऑफ १६ मध्ये ३ मोठ्या रोमांचक लढती होणार आहेत. पहिली लढत ख्रिस्तियानो रोनाल्डोचा पोर्तुगालचा संघ आणि लामिने यामल असलेल्या स्पेन या संघांमध्ये खेळवला जाईल. सर्वात वयस्कर खेळाडू व सर्वात तरूण खेळाडू यांच्या मधील रोमांचक असणार आहे. यानंतर दुसरी लढत अर्जेंटिना व इजिप्त या संघांमध्ये होईल. लिओनेल मेस्सी व मोहम्मद सलाह हे दोन स्टार खेळाडू एकमेकांसमोर असतील. तर नेमायरचा ब्राझील व एर्लिंग हॉलंड असलेला नॉर्वेचा संघ आमनेसामने असतील, ही लढत देखील स्पर्धेतील अजून एक रोमांचक लढत असेल.
