scorecardresearch

FIFA World Cup 2022: ऑस्ट्रेलियाची टय़ुनिशियावर मात

FIFA World Cup: विश्वचषक स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी ऑस्ट्रेलियाला टय़ुनिशियाविरुद्ध पराभव टाळणे गरजेचे होते.

FIFA World Cup 2022: ऑस्ट्रेलियाची टय़ुनिशियावर मात

अल वाकरा : विश्वचषक स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी ऑस्ट्रेलियाला टय़ुनिशियाविरुद्ध पराभव टाळणे गरजेचे होते. मात्र, ऑस्ट्रेलियाने केवळ पराभव टाळला नाही, तर टय़ुनिशियावर १-० असा विजय मिळवत बाद फेरीच्या आशा कायम राखल्या. सलामीच्या लढतीत फ्रान्सकडून पराभव पत्करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने टय़ुनिशियाविरुद्ध उत्तम खेळ केला. २३व्या मिनिटाला आघाडीपटू मिचेल डय़ुकने हेडरच्या साहाय्याने गोल करत ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळवून दिली. मग उर्वरित सामन्यात ऑस्ट्रेलियाने भक्कम बचाव करून २०१०नंतर विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली.

या सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघांमध्ये चुरस पाहायला मिळाली. मात्र, २३व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाला गोलचे खाते उघडण्यात यश आले. गोलरक्षक मॅट रायनने डय़ुककडे पास दिला, त्यानंतर डय़ुकने चेंडू डाव्या बाजूला क्रेग गुडविनकडे सरकवला. गुडविनकडे पास देताच डय़ुकने थेट गोलच्या दिशेने धाव घेतली. मग गुडविनच्या क्रॉसवर हेडर मारून गोल करत डय़ुकने ऑस्ट्रेलियाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर टय़ुनिशियाकडून पुनरागमनाचे प्रयत्न सुरू झाले. मात्र, ऑस्ट्रेलियानेही उत्कृष्ट बचाव करत टय़ुनिशियाला गोल करण्यापासून रोखले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 01:02 IST

संबंधित बातम्या