खेळांसाठी कोल्हापूर उगाचच प्रसिद्ध नाही हे कालच्या फिफा विश्वचषकातील अंतिम सामन्यावरून दिसून आले. मेस्सीच्या अर्जेंटिना विजय मिळवला मात्र जल्लोष कोल्हापुरात झाला. उगाचच  कोल्हापूरला पुरेपूर कोल्हापूर असे म्हणत नाही. अर्जेंटीना विरुद्ध फ्रान्स यांच्यात झालेल्या फुटबॉलवर्ल्ड कप फायनलचा थरार साऱ्या जगानं अनुभवला. शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीनं खेळल्या गेलेल्या या मॅचमध्ये अर्जेंटीनानं पेनल्टी शूट आऊटवर बाजी मारली आणि लिओनेल मेस्सीचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न पूर्ण झालं. मेस्सीच्या स्वप्नपूर्तीची दिवाळी फुटबॉलवेड्या कोल्हापूरात साजरी झाली. शनिवारी रात्री संपूर्ण कोल्हापूर शहर फुटबॉल आणि मेस्सीमय झालं होतं.

अर्जेंटिनाचा फायनलमध्ये विजय झाल्यानंतर फुटबॉलवेड्या कोल्हापुरात तरुणांनी मुख्य चौकात गर्दी करत मोक्कार जल्लोष केला आहे. त्याचा एक व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोल्हापुरात स्टार फुटबॉलपटू लिओनोल मेस्सीच्या चाहत्यांची संख्या लक्षणीय आहे. महाराष्ट्रात कोल्हापुरला फुटबॉलवेडं शहर समजलं जातं. रविवारी वर्ल्डकप फायनलमधील फ्रान्स आणि अर्जेंटिना या संघातील सामना पाहण्यासाठी शहरातील अनेक चौकात एलईडी स्क्रिन्स लावून चाहत्यांनी सामन्याचा सामूहिक आनंद घेतला. ज्या प्रमाणे कतारच्या स्टेडियममध्ये गर्दी होती, त्याचप्रमाणे कोल्हापुरातील चौकाचौकात तरुणाई सामन्याचा आनंद घेत होती.

Anant Radhika's Pre-Wedding Ceremony Updates in Marathi
MS Dhoni : माही साक्षीसह अनंत राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी जामनगरला रवाना, VIDEO होतोय व्हायरल
gujarat giants
WPL 2024 : गुजरात जायंट संघाला मिळालीय ‘ही’ विशेष परवानगी; जाणून घ्या कारण…
kl rahul still not fit likely to miss 5th Test against england in dharamsala
केएल राहुल अजूनही जायबंदीच;अखेरच्या कसोटी सामन्यातही खेळण्याची शक्यता कमीच
Ranji Trophy 2024 Semi Final Updates in Marathi
Ranji Trophy 2024 : श्रेयस अय्यर मुंबईकडून उपांत्य फेरी खेळण्यासाठी उपलब्ध, एमसीएने दिली माहिती

कोल्हापुरात काल दिवाळी साजरी झाल्यासारखे वाटत होते. मेस्सीनं ‘वन लास्ट चान्स’ या वाक्याला साजेशी कामगिरी करत खरं केलं.. भावानं विश्वचषक जिंकायचं स्वतःचं आणि आमचं पण स्वप्न पूर्ण केलं.. अशा भावना व्यक्त करत कोल्हापूरातील तरुणांनी जल्लोष केला. या सामन्यामधील चुरस ज्याप्रमाणे कतारमधील स्टेडियममध्ये होती, अगदी तसेच वातावरण अख्या कोल्हापूर शहरात पाहायला मिळत होते. चौकाचौकात मोठमोठे स्क्रीन लावून या मॅचचा आनंद लुटण्यात कोल्हापूरकर मग्न झाले होते. तिकडं गोल झाला रे झाला, की लगेच इकडे स्क्रीन समोर जल्लोष सुरु होत होता. चौकांबरोबरच कोल्हापुरातील मैदान, टर्फ यांच्यावर देखील मोठ्या संख्येने कोल्हापूरकर सामना बघण्यासाठी जमले होते.

(लिओनोल मेस्सी) साहेबाचं फिफा विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न साकार झालं. त्यानंतर जगभरातील चाहत्यांनी एकच जल्लोष केला. परंतु पेनल्टी शूट आऊटमध्ये अर्जेंटिनानं विजय मिळवल्यानंतर कोल्हापुरात फुटबॉलवेड्या चाहत्यांनी थेट रस्त्यावर उतरत आनंदोत्सव साजरा केला आहे. रात्री उशिरापर्यंत तरुणाईनं फटाक्यांची आतिषबाजी करत आणि लिओनोल मेस्सीच्या पोस्टरला दुग्धाभिषेक करत असल्यानं संपूर्ण कोल्हापूर शहर फुटबॉल आणि मेस्सीमय झाल्याचं पाहायला मिळालं.