scorecardresearch

Football World Cup: मोठी बातमी! लिओनेल मेसीकडून निवृत्तीची घोषणा, फायनल ठरणार अंतिम सामना

अर्जेंटिनाने क्रोएशियावर ३-० अशी मात करत सहाव्यांदा विश्वचषक २०२२ च्या अंतिम फेरी गाठल्यानंतर मेसीचा मोठा निर्णय

Football World Cup: मोठी बातमी! लिओनेल मेसीकडून निवृत्तीची घोषणा, फायनल ठरणार अंतिम सामना
मेसी निवृत्त होणार

अर्जेंटिनाने क्रोएशियावर ३-० अशी मात करत सहाव्यांदा विश्वचषक २०२२ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दरम्यान हा अंतिम सामना अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेसीचाही शेवटचा सामना असणार आहे. मेसीने या सामन्यानंतर आपण निवृत्त होणार असल्याचं जाहीर केलं आहे. मेसीने या विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत पाच गोल केले असून, अर्जेंटिनाचा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला आहे. मेसीच्या नावावर आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये ११ गोल केल्याचा रेकॉर्ड आहे.

“ही कामगिरी केल्याचा मला आनंद आहे. अंतिम सामना खेळत माझा वर्ल्डकपमधील प्रवास संपत आहे याचा मला आनंद आहे,” असं मेसीने अर्जेटिनामधील Diario Deportivo Ole या वृत्तसंस्थेशी बोलताना दिला आहे.

विश्लेषण: अर्जेंटिनासाठी ‘मेसी मॅजिक’ अजूनही निर्णायक… मेसीला थोपवणे शक्य आहे का?

“पुढील स्पर्धेसाठी बरीच वर्षं शिल्लक असून, मला ते शक्य होईल असं वाटत नाही. अशाप्रकारे शेवट होणं हेच सर्वोत्तम आहे,” असं मेसीने सांगितलं आहे. क्रोएशियाविरोधातील विजयानंतर मेसीने संघातील खेळाडूंना या क्षणाचा आनंद घ्या असं म्हटलं. “अर्जेंटिना पुन्हा एकदा वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत आहे, आनंद लुटा,” असं त्याने सहकाऱ्यांना सांगितलं.

“आम्ही अनेकदा खडतर स्थितीतून गेले आहोत. काही चांगले क्षणही अनुभवले आहेत. आज आम्ही एक वेगळाच अनुभव घेत आहोत,” अशा भावना मेसीने व्यक्त केल्या.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-12-2022 at 14:34 IST

संबंधित बातम्या