FIFA World Cup Qatar Stadium 974 will be Disappeared As Football FIFA Final Ends Know The Magic Trick BTS | Loksatta

FIFA फुटबॉल विश्वचषक संपताच ‘974 स्टेडियम’ होणार पूर्णपणे गायब; ‘या’ जादूमागचं खास गुपित, जाणून घ्या

FIFA World Cup Stadium 974: शुक्रवारी याच स्टेडियममध्ये स्वित्झर्लंडने सर्बियाचा पराभव केला होता. तर उद्या ब्राझील विरुद्ध दक्षिण कोरिया हा शेवटचा सामना या मैदानात खेळवला जाणार आहे.

FIFA World Cup Qatar Stadium 974 will be Disappeared As Football FIFA Final Ends Know The Magic Trick BTS
FIFA फुटबॉल विश्वचषक संपताच '974 स्टेडियम' होणार पूर्णपणे गायब (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम/ ट्विटर)

FIFA World Cup Stadium 974: विश्वचषकासाठी कतारने बांधलेल्या सात स्टेडियमपैकी एक संपूर्ण स्टेडियम हे स्पर्धेनंतर गायब होणार आहे. आयोजकांनी दोहा येथील स्टेडियम 974 बद्दल सांगितलेल्या माहितीनुसार ४०,००० पेक्षा जास्त आसन क्षमता असणारे हे स्टेडीयम शिपिंग कंटेनर्स वापरून साकारण्यात आले आहे. फिफा विश्वचषकाच्या नंतर हे स्टेडियम पूर्णपणे तोडून यातील कंटेनर्स व अन्य साहित्य हे गरज व मागणीनुसार अन्य देशांना पाठवण्यात येणार आहे.

स्टेडियम 974 हे नाव कसं पडलं?

स्टेडियम 974, हे नाव मुळात कतारच्या आंतरराष्ट्रीय डायलिंग कोड आणि स्टेडियम तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या कंटेनरच्या संख्येवरून देण्यात आले, विश्वचषकासाठी बांधण्यात आलेल्या स्टेडियमपैकी हे एकमेव असे ठिकाण आहे हे वातानुकूलित नाही. त्यामुळे या स्टेडियममध्ये सर्व सामने हे संध्याकाळच्या वेळी खेळवले जातात. इतर ठिकाणांपेक्षा या स्टेडियममध्ये हवा दमट आणि उष्ण होती.

पांढरा हत्ती..

स्टेडियम 974 आणि इतर दोन विश्वचषक स्टेडियमचे डिझाइन करणाऱ्या फेनविक इरिबरेन यांनी सांगितले की, “दक्षिण आफ्रिका, रशिया व ब्राझील मधील विश्वचषक स्पर्धेनंतरचे उदाहरण पाहता नवे स्टेडियम उभारून ‘पांढरा हत्ती’ पोसावा लागू नये असा मुख्य हेतू होता. स्पर्धा संपल्यानंतर ही जागा पुन्हा वापरासाठी मोकळी होऊ शकेल.” तसेच फिफा विश्वचषक संपल्यावर सुद्धा इतर सहा स्टेडियममधील आसन क्षमता रिक्त करून जागा मोकळी करण्यात येणार आहे.

हे ही वाचा<< IND vs BAN ODI: के. एल. राहुलचा ऋषभ पंतबाबत मोठा खुलासा, म्हणाला “BCCI ने पंतला संघातून काढताना एक..”

स्टेडियम 974 च्या बांधकामात रंगेबेरंगी शिपिंग कंटेनर वापरलेले आहेत. संरचनेच्या आतील भागात स्वच्छतागृहांसारख्या सुविधांदेण्यात आल्या आहेत. लाल, पिवळे आणि निळे बॉक्स विविध थरांमध्ये रचलेले आहेत, या डिझाइनमुळे स्टेडियमला ​​एक औद्योगिक स्वरूप मिळते.

दरम्यान, शुक्रवारी याच स्टेडियममध्ये स्वित्झर्लंडने सर्बियाचा पराभव केला होता. तर उद्या ब्राझील विरुद्ध दक्षिण कोरिया हा शेवटचा सामना या मैदानात खेळवला जाणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 16:16 IST
Next Story
IND vs BAN: “जर केएल राहुलला विश्वचषक खेळायचा असेल तर…” हर्षा भोगलेंनी केले मोठे विधान