जगज्जेता बनल्यानंतर महान कर्णधार लिओनेल मेस्सीचा संघ मायदेशी पोहोचला तेव्हा ५० लाख लोक त्याच्या स्वागतासाठी रस्त्यावर उतरले. संघाला खुल्या बसमध्ये विजयी मिरवणूक करावी लागली. सुमारे ११ किमीपर्यंत खचाखच भरलेल्या गर्दीत प्रवेश करताच लोकांनी टीम बसमधून उड्या मारायला सुरुवात केली. काही जण बसबाहेरही पडले. प्रकरण गंभीर होत असल्याचे पाहून हेलिकॉप्टर पाचारण करण्यात आले आणि टीमला एअरलिफ्ट करण्यात आले.

अर्जेंटिनाच्या ३६ वर्षांनंतर विश्वचषक जिंकल्याचा आनंद साजरा करण्यासाठी आणि त्यांच्या आवडत्या खेळाडूंची झलक पाहण्यासाठी लाखो लोक ब्युनोस आयर्सच्या रस्त्यावर उतरले, त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आणि मिरवणूक थांबली. लोक झेंडे घेऊन आले होते, ते उत्साहाने नाचत होते आणि गात होते पण त्यांची संख्या इतकी जास्त होती की, त्यामुळे खेळाडूंची विजयी मिरवणूक खुल्या बसमध्ये थांबवून त्यांना हेलिकॉप्टरमधून एअरलिफ्ट करावे लागले आणि मग अवकाशातून मिरवणूक सुरु ठेवावी लागली.

MS Dhoni Only Given Limited Batting In CSK Trainer Explains Why
MS धोनीला शेवटच्याच षटकांमध्ये फलंदाजी देण्याचं कारण अखेरीस आलं समोर; प्रशिक्षक म्हणाले, “त्याचे शॉट्स..”
Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
big boss winner munawar faruqui
‘बिग बॉस’ विजेता मुनावर फारुकीवरून दुकानात येण्यावर दोन व्यावसायिकांमध्ये वाद, सात जणांवर गुन्हा दाखल
hardik pandya marathi news, hardik pandya mumbai indians marathi news
दोन सामने, दोन पराभव, दोन मोठ्या चुका! कर्णधार हार्दिक पंड्याचे डावपेच मुंबई इंडियन्ससाठी मारक ठरत आहेत का?

हेही वाचा:  IPL 2023 Auction: कर्णधारपदासाठी सनरायझर्स ‘या’ भारतीय खेळाडूवर लावतील पैज, इरफान पठाणने काव्या मारनला सुचवले नाव 

सुरक्षेसाठी बसला थांबवून केले एअरलिफ्ट

अर्जेंटिना सरकारने याला हवाई विजयी मिरवणूक म्हटले आहे. राष्ट्राध्यक्ष अल्बर्टो फर्नांडीझ यांच्या प्रवक्त्या गॅब्रिएला सेरुती यांनी सोशल मीडियावर लिहिले की, “जागतिक विजेते संपूर्ण मार्ग हेलिकॉप्टरने उड्डाण करत आहेत कारण मोठ्या संख्येने लोक येत असल्यामुळे रस्त्यावरून मिरवणूक सुरू ठेवणे अशक्य होते,”

“चाहत्यांच्या गराड्यात खेळाडूंची सुरक्षा देखील तितकीच महत्वाची आहे. विजयी मिरवणुकीपेक्षा मेस्सी आणि त्याच्या संघातील खेळाडूंचा जीव अधिक मोलाचा आहे. त्यामुळे अशावेळी कुठलीही वाईट घटना घडू नये म्हणून आम्ही खबरदारी बाळगत त्यांना हेलिकॉप्टरमधून एअरलिफ्ट केले.” असे राष्ट्राध्यक्ष अल्बर्टो फर्नांडिस यांच्या प्रवक्त्या गॅब्रिएला सेरुती यांनी पुढे सोशल मीडियावर लिहिले आहे.

अर्जेंटिना सरकारवर जनता भडकली

विजयी संघाने हेलिकॉप्टरमधून राजधानीबाहेर अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनच्या मुख्यालयाकडे उड्डाण केले. त्यानंतरही काही चाहत्यांचा रस्त्यावर आनंदोत्सव सुरु होता, परंतु १९८६ नंतर प्रथमच त्यांच्या संघाने विश्वचषक जिंकल्याची झलक पाहण्यास न मिळाल्याने अनेक चाहत्यांची निराशा जाहीर केली. संघाची एक झलक पाहण्यासाठी सकाळपासून वाट पाहत असलेले २५ वर्षीय डिएगो बेनाविडेझ म्हणाला, “विजयी संघासोबत विजयोत्सव व्यवस्थित करता यावा त्यासाठी सरकारने आयोजन करणे आवश्यक होते. सरकारला माहिती असायला हवे होते की जनता किती प्रमाणात रस्यांवर येणार आहे आणि कशापद्धतीने आपण यावर तोडगा काढून नियोजन होणे आवश्यक होते. हे सर्व झाले नाही म्हणून आम्ही संतापलो आहोत. त्यांनी आमच्याकडून विश्वचषकाची मजा हिरावून घेतली.”

लोकांनी बसवर उड्या मारायला सुरुवात केली

मोठ्या संख्येने चाहत्यांच्या आगमनामुळे सरकारची मजबुरी समजणारे अनेक जण होते आणि त्यामुळे ते उत्सवात मग्न झाले.३३ वर्षीय निकोलस लोपेझ जो आपल्या सात वर्षांच्या मुलीसह मिरवणुकीत आला होता.  तो म्हणाला, “मी निराश नाही. आम्ही आनंद साजरा करत आहोत.” खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या खुल्या बसमध्ये पुलावरून दोन जणांनी उडी मारल्याने मिरवणूक काही वेळातच थांबवण्यात आली. त्यातील एक बसच्या आत तर दुसरा फूटपाथवर पडला. फुटबॉल संघटनेचे प्रमुख क्लॉडिओ तापिया यांनी ढिसाळ नियोजनासाठी सरकारी यंत्रणेला जबाबदार धरले. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, “आमच्यासोबत असलेले सुरक्षा कर्मचारी आम्हाला पुढे जाऊ देत नव्हते. सर्व चॅम्पियन खेळाडूंच्या वतीने मी माफी मागतो.”