वृत्तसंस्था, दोहा : मोरोक्कोविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागल्याने पोर्तुगालचे विश्वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. त्यानंतर पोर्तुगालचा कर्णधार आणि तारांकित आघाडीपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या भविष्याबाबत चर्चा रंगली आहे. मात्र, विश्वचषक विजेतेपदाचे स्वप्न अधुरेच राहिले असे म्हणतानाच रोनाल्डोने निवृत्तीबाबत भाष्य करणे टाळले.

‘‘निवृत्तीबाबत इतक्या लवकर निर्णय घेणार नसलो, तरी पोर्तुगालसाठी विश्वचषक जिंकण्याचे माझे स्वप्न अधुरेच राहिले,’’ अशी प्रतिक्रिया रोनाल्डोने व्यक्त केली. मोरोक्कोकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर रोनाल्डोला मैदान सोडताना अश्रू अनावर झाले होते. त्यानंतर त्याने प्रसारमाध्यमांसमोर येणे टाळले. मात्र, समाजमाध्यमांवर संदेश लिहित त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘‘निवृत्तीबाबत इतक्यात बोलणार नाही. त्यासाठी मी वेळ घेणार आहे. उतावळेपणा करून प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही. गेल्या काही दिवसांत माझ्याबाबत बरेच काही बोलले जात आहे. मात्र, हे केवळ तर्कवितर्क आहेत. पोर्तुगालसाठी सर्वस्व देण्यात मी कुठेही कमी पडलो नाही. मी माझा देश आणि सहकाऱ्यांकडे कधीही पाठ फिरवणार नाही. पोर्तुगालला जागतिक स्तरावर सर्वोच्च स्थान मिळवून देणे हेच माझे एकमेव ध्येय आहे आणि राहील,’’ असे रोनाल्डो म्हणाला.  

IRE vs AFD 1st Test Match Updates in Marathi
IRE vs AFG : आयर्लंडचा पहिलावहिला कसोटी विजय; अफगाणिस्तानवर ६ विकेट्सनी मात
Sourav Ganguly Reacts After Sunil Gavaskar Called Dhruv Jurel The Second Rising MS Dhoni
Sourav Ganguly : ‘माही’भाईशी जुरेलची तुलना होताच ‘दादा’ची रोखठोक प्रतिक्रिया; म्हणाला, “धोनीला धोनी बनण्यासाठी…”
marathi actress Amruta Subhash and sandesh kulkarni Love story Entdc
पहिल्या भेटीतलं प्रेम, १७व्या वर्षी लग्नाची मागणी अन् मूल होऊ न देण्याचा निर्णय; वाचा अमृता सुभाषची फिल्मी लव्हस्टोरी
ishan kishan & shreyas iyer
श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना बीसीसीआयच्या वार्षिक करारातून का वगळण्यात आलं?

रोनाल्डोसाठी विराटचे भावुक ट्वीट

भारताचा तारांकित क्रिकेटपटू विराट कोहली हा रोनाल्डोला आदर्श मानतो. तंदुरुस्तीच्या आघाडीवर त्याने रोनाल्डोकडून प्रेरणा घेतली आहे. त्यामुळे विश्वचषक विजेतेपदाच्या शर्यतीतून पोर्तुगाल बाहेर पडल्यावर विराटने रोनाल्डोबाबत भावुक ट्वीट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘‘रोनाल्डो, तू फुटबॉलमध्ये आजपर्यंत जी कामगिरी केली आहेस आणि असंख्य चाहत्यांचे प्रेम मिळवले आहेस, ते कुठलेही विजेतेपद किंवा करंडक मिळवून देणार नाही. कोणत्याही विजेतेपदाने आपला चाहत्यांवरील प्रभाव कळत नसतो. तू तुझ्या खेळातून जो प्रभाव पाडतोस, तो सर्वात महत्त्वाचा आहे. कठोर मेहनत आणि फुटबॉलविषयी असलेली तुझी समर्पित भावना खूप काही सांगून जाते. कुठल्याही खेळाडूसाठी तुझी कारकीर्द नेहमीच प्रेरणादायक राहील,’’ असे विराटने ट्वीटमध्ये म्हटले आहे.