कतारमध्ये सुरु असलेला फिफा विश्वचषक आता अंतिम टप्प्यात आला आहे. अर्जेंटिनाने उपांत्य सामन्यात मागील विश्वचषकातील उपविजेत्या क्रोएशियाला ३-० असे हरवत तर दुसऱ्या सामन्यात फ्रान्सने मोरोक्कोला २-० असे नमवत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. आता फिफा विश्वचषकात दोन बलाढ्य प्रतिस्पर्धी अर्जेंटिना आणि फ्रान्स अंतिम सामन्यात एकमेकांशी भिडणार आहेत. कतारमधील या दोघांचा प्रवास हा तर सर्वानीच पहिला आहेच त्यामुळे दोन्ही तुल्यबळ असताना अंतिम सामन्यात अधिक रंगत येईल यात कुठलीच शंका नाही. फुटबॉल चाहत्यांना देखील याची उत्सुकता लागली आहे.

फिफा विश्वचषकात आतापर्यंत तीन असे संघ आहेत ज्यांनी सलामीचा सामना गमावून देखील ते विश्वविजेते राहिले. तसाच काहीसा प्रकार अर्जेंटिनाच्या बाबतीत या विश्वचषकात झाला आहे. या विश्वचषकात अर्जेंटिनाला पहिल्याच साखळी सामन्यात सौदी अरेबियाकडून १-२ असा पराभव स्विकारावा लागला. या पराभवातून सावरत पुढे लगेच मुसंडी मारत मेस्सीच्या संघाने शानदार प्रदर्शन केले. त्यामुळे अर्जेंटिना संघासाठी ही जमेची बाजू आहे. त्यानंतर मेक्सिको आणि पोलंडला २-० ने हरवत उपउपांत्यपूर्व सामन्यात स्थान निश्चित केले. अंतिम १६ गटात ऑस्ट्रेलियावर २-१ असा विजय मिळवल्यानंतर उपांत्यपूर्व सामन्यात नेदरलँड्सचा विरुद्ध पेनल्टी शूटआउटमध्ये ४-३ ने पराभव केला. उपांत्य फेरीत गतवेळच्या उपविजेत्या क्रोएशियाविरुद्ध ३-० असा चमकदार कामगिरी करत मेस्सीच्या संघाने अंतिम फेरीत धडक मारली.

Australia vs New Zealand 1st Match Updates in Marathi
NZ vs AUS : ग्रीन-हेझलवूडची शेवटच्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी, कॅमेरूनच्या शतकाने सावरला ऑस्ट्रेलियाचा डाव
team india kl rahul bcci
IND Vs ENG : केएल राहुल पाचव्या कसोटीलाही मुकणार, संघात दिग्गज खेळाडूचं पुनरागमन; अशी असेल टीम इंडिया
Jan Nicol Loftie Eaton Breaks Kusal Malla's Record
VIDEO : नामिबियाच्या फलंदाजांने झळकावले सर्वात वेगवान शतक, नेपाळविरुद्ध पाडला चौकार-षटकारांचा पाऊस
Mumbai vs Baroda Ranji Trophy Trophy Hardik Tamore century
हार्दिक तामोरेची शतकी खेळी

‘हे’ तीन संघ ज्यांनी सलामीच्या सामन्यात पराभव होऊनही विश्वविजेते झाले

१९६६ मध्ये इंग्लंड

इंग्लिश संघाने १९६६ मध्ये विश्वचषक जिंकला होता. गेल्या काही वर्षांमध्ये इंग्लंड अनेक प्रसंगी फेव्हरेट्समध्ये राहिला आहे, परंतु प्रसिद्धीनुसार तसा खेळ करू शकला नाही. डेव्हिड बेकहॅम, पॉल स्कूल्स, फ्रँक लॅम्पार्ड, स्टीव्हन जेरार्ड, वेन रुनी यांचा समावेश असलेल्या सुवर्ण पिढीला फिफा विश्वचषक स्पर्धेत यश मिळायला हवे होते असे अनेकांचे मत आहे. पण उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडने गेल्या २० वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी केली आहे. १९६६ चा विश्वचषक इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये १६ संघांनी अंतिम फेरीसाठी भाग घेतला होता. इंग्लंड, पश्चिम जर्मनी, पोर्तुगाल आणि सोव्हिएत युनियन उपांत्य फेरीत पोहोचले जेथे इंग्लंडने पोर्तुगालला २-१ ने पराभूत केले आणि पश्चिम जर्मनीने सोव्हिएत युनियनवर समान स्कोअरलाइनसह विजय मिळवून एक संस्मरणीय ठरेल अशी कामगिरी करत त्यांनी अंतिम फेरी गाठली आणि त्यांनी तो विश्वचषक देखील जिंकला. इंग्लंड विरुद्ध पश्चिम जर्मनी हा चुरशीचा अंतिम सामना होता ज्यामध्ये ज्योफ हर्स्टने अतिरिक्त वेळेत दोनदा गोल करून इंग्लंडला जगज्जेते बनवले. हर्स्टने अंतिम फेरीत हॅट्ट्रिक केली जी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत हॅट्ट्रिक करण्याची एकमेव घटना आहे.

हेही वाचा: FIFA WC Final: सौदीकडून पहिल्याच सामन्यात झटका ते ट्युनेशियाकडून पराभव; अर्जेंटिना, फ्रान्सचा फायनल्सपर्यंतचा रंजक प्रवास

१९८२ मध्ये इटली

१९८२ फिफा विश्वचषक ही या गौरवशाली स्पर्धेची १२ वी आवृत्ती होती. फिफाच्या इतिहासात स्पेनने प्रथमच विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषवले. विश्वचषक स्पर्धेत पेनल्टी शूटआऊटची ही पहिलीच वेळ होती. सँटियागो बर्नाबेउ येथे झालेल्या अंतिम सामन्यात इटलीने पश्चिम जर्मनीचा ३-१ असा पराभव करून तिसरे विश्वचषक जिंकले. संघाने एकही गट सामना जिंकला नसतानाही विश्वचषक जिंकण्याची ही एकमेव वेळ होती. ग्रुप स्टेजमध्ये इटलीला पोलंड, कॅमेरून आणि पेरू सोबत जोडले गेले. अझ्झुरीने त्यांच्या मोहिमेची सुरुवात पोलंड विरुद्ध ०-० अशी बरोबरी करून त्यानंतर पेरू विरुद्ध १-१ अशी बरोबरी साधून गट फेरीचा शेवट कॅमेरूनविरुद्ध आणखी एक बरोबरीत केला. पेरू आणि कॅमेरून यांच्या खराब गोल फरकामुळे इटलीला बाद फेरीसाठी पात्र ठरविण्यात यश आले. पण इटालियन संघाने फायनलमध्ये यजमान स्पेन, पोलंड आणि पश्चिम जर्मनीला पराभूत करून तिसरे विश्वविजेतेपद पटकावले.

२०१० मध्ये स्पेन

सर्वात अलीकडील विश्वचषक विजेते जे त्यांच्या सुरुवातीचा सामना जिंकू शकले नाहीत. इतिहासात ही एकमेव वेळ आहे जेव्हा एखाद्या संघाने सुरुवातीचा सामना गमावूनही विश्वचषक जिंकला. स्पेनने युरो २००८ जिंकले होते आणि दक्षिण आफ्रिकेतील २०१० च्या विश्वचषकासाठी ते फेव्हरिट असल्याचे सांगण्यात आले होते. दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच फिफा विश्वचषकाचे आयोजन केले जात होते. फिफा विश्वचषक २०१० मध्ये स्वित्झर्लंड विरुद्धच्या त्यांच्या सुरुवातीच्या सामन्यात स्पेनने जबरदस्त कामगिरी करत आपण फेव्हरेट असल्याचे दाखवून देईल असे वाटत होते. पण स्वित्झर्लंडच्या एका गोलने जगाला धक्का दिला आणि त्यामुळे स्पेनचा स्वित्झर्लंडकडून ०-१ असा पराभव झाला.

हेही वाचा: FIFA World Cup: अर्जेंटिना आणि फ्रान्स वर्ल्डकपमध्ये कितीवेळा आलेत आमने-सामने, जाणून घ्या

पण या धक्कादायक पराभवानंतर स्पॅनिश संघ स्वतःला थांबू शकला नाही कारण त्यांनी प्रत्येक प्रतिस्पर्ध्यावर आखणी करून विजय मिळवले. आंद्रेस इनिएस्टा, झेवी आणि कार्लेस पुयोल यांचा समावेश असलेल्या स्पेन संघाने त्यांच्या खेळाच्या शैलीने प्रत्येक प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व गाजवले आणि फिफा विश्वचषक चॅम्पियन म्हणून ते उदयास आले, जे त्यांनी यापूर्वी कधीही केले नव्हते.