भुवनेश्वर : हरमनप्रीत सिंगच्या दोन गोलमुळे भारताने गुरुवारी ‘एफआयएच’ प्रो लीग हॉकीमधील अननुभवी जर्मनीविरुद्धच्या पहिल्या लढतीत ३-० असा शानदार विजय मिळवला. हरमनप्रीतने अनुक्रमे १८व्या आणि २७व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतरण केले. अभिषेकने ४५व्या मिनिटाला तिसरा गोल नोंदवला. जर्मनीच्या २२ खेळाडूंच्या चमूपैकी सहा खेळाडूंनी या सामन्याद्वारे वरिष्ठ गटात पदार्पण केले.  या सामन्यातील विजयासह ११ सामन्यांत २४ गुण मिळवत भारताने आपले अग्रस्थान अबाधित राखले आहे. दुसऱ्या स्थानावरील जर्मनीने ९ सामन्यांतून १७ गुण कमावले आहेत.