Finally dates of WPL 2023 decided it is in march and first match is in between adani vs ambani | Loksatta

WPL 2023: महिला आयपीएलचं बिगुल वाजलं! मुंबईच्या मैदानांवर रंगणार सामने, अंबानी vs अदानी कोणता संघ जिंकणार? चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Women’s IPL 2023: महिला प्रीमियर लीगचा लिलाव १३ फेब्रुवारीला मुंबईत होणे जवळपास निश्चित झाले आहे. यासाठी मोठ्या संख्येने खेळाडू स्वारस्य दाखवत आहेत.

Finally dates of WPL 2023 decided it is in march and first match is in between adani vs ambani
संग्रहित छायाचित्र (ट्विटर)

महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्राचा लिलाव सुपरहिट ठरणार आहे. प्रत्यक्षात, या लीगसाठी उपलब्ध असलेल्या ९० स्लॉटसाठी सुमारे १००० खेळाडूंनी नोंदणीसाठी स्वारस्य दाखवले आहे. महिला खेळाडूंमध्ये या लीगसाठी प्रचंड उत्साह आहे. न्यूज १८च्या वृत्तात, एका सूत्राने सांगितले की, ‘महिला प्रीमियर लीगसाठी प्रचंड रस आहे. आतापर्यंत १००० खेळाडूंनी लिलावासाठी साइन अप केले आहे. या लिलावात भारतासोबतच परदेशी खेळाडूही मोठी उत्सुकता दाखवत आहेत. त्याच दरम्यान महिला आयपीएलचं बिगुल वाजलं आहे. मुंबईच्या मैदानावर हे सर्व सामने होणार आहेत.

मुकेश अंबानीच्या मुंबई इंडियन्सने ९१२ कोटींत मुंबई, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ९०१ कोटींत बंगळुरू, कॅप्री ग्लोबलने ७५७ कोटींत कोलकाता आणि JSW ग्रुपने ८१० कोटींत बंगळुरूचे हक्क जिंकले आहेत. महिला प्रीमिअर लीगसाठी बीसीसीआयने मागवलेल्या प्रसारण हक्काच्या बोलीत वायकॉम १८ ने डिझनी स्टार आणि सोनीला मागे टाकून पाच वर्षांसाठी ९५१ कोटींची सर्वाधिक बोली लावली. १३ फेब्रुवारीला WPL Auction होणार आहे. त्याआधी आज Cricbuzz ने महिला प्रीमिअर लीगचे वेळापत्रक जाहीर केले.

क्रिकबज वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार महिला प्रीमिअर लीगची ४ मार्चला सुरुवात ही टीम मुंबई व टीम अहमदाबाद यांच्यातील लढतीने होईल. म्हणजेच अंबानी विरुद्ध अदानी असा सामना रंगणार आहे. नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर या लीगची सुरुवात होणार आहे आणि BCCI तशी आखणी करत आहे.

हेही वाचा: IND vs AUS: ‘जळी, स्थळी, काष्ठी पाषाणी’ दिसे केवळ अश्विनची फिरकी! आव्हानाचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने घेतली चक्क त्याच्याच डुप्लिकेटची मदत

सीसीआय व डी वाय पाटील स्टेडियमवर ४ ते २६ मार्च या कालावधीत या लीगचे सामने खेळवले जातील. वानखेडे स्टेडियमवर १७ मार्चला भारत-ऑस्ट्रेलिया वन डे सामना होणार आहे आणि त्यामुळे येथे महिला प्रीमिअर लीगच्या लढती होणे अशक्य आहेत. त्यात १ एप्रिलपासून इंडियन प्रीमिअर लीगलाही सुरुवात होणार आहे. महिला प्रीमिअर लीगची दुसरी लढत टीम बंगळुरू विरुद्ध टीम दिल्ली अशी ५ मार्चला सीसीआयवर होण्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. पाच संघांचा समावेश असलेल्या या लीगमध्ये एकच एलिमिनेटर सामना असेल. पाचपैकी तीन संघ प्ले ऑफमध्ये स्थान पक्के करतील. पहिल्या क्रमांकाचा संघ थेट फायनलमध्ये जाईल. तर दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या संघात एलिमिनेटरचा सामना होईल. एकूण २२ सामने खेळवले जातील.

ही मूळ किंमत असू शकते

येथे, अनकॅप्ड खेळाडूंसाठी १० आणि २० लाख रुपयांची मूळ किंमत आणि कॅप्ड खेळाडूंसाठी ३०, ४० आणि ५० लाख रुपयांची मूळ किंमत असलेली श्रेणी तयार करण्याची माहिती आहे. महिला आयपीएलचा पहिला सीझन ४ ते २४ मार्च दरम्यान खेळवला जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Ramiz Raja: “भारताने पाकिस्तानी गोलंदाजी क्रिकेट मॉडेल केली नक्कल…” रमीझ राजाचे बेताल वक्तव्य

हे ५ संघ WPL च्या पहिल्या सत्रात दिसणार आहेत

नुकताच WPL साठी संघांचा लिलाव झाला. पहिल्या सत्रात ५ संघ खेळणार आहेत. अशा परिस्थितीत या ५ फ्रँचायझी खरेदी करण्यासाठी १७ कंपन्यांमध्ये स्पर्धा होती. येथे आयपीएलचे मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांना प्रत्येकी एक संघ मिळाला. इतर दोन संघ अदानी स्पोर्ट्सलाइन प्रायव्हेट लिमिटेड आणि कॅप्री ग्लोबल होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड यांनी विकत घेतले. या ५ संघांची एकूण ४६७० कोटी रुपयांना विक्री झाली.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 19:23 IST
Next Story
IND vs AUS: ‘जळी, स्थळी, काष्ठी पाषाणी’ दिसे केवळ अश्विनची फिरकी! आव्हानाचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने घेतली चक्क त्याच्याच डुप्लिकेटची मदत